Daily Horoscope 29 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांची आज एका विशिष्ट व्यक्तीशी होणार भेट

मेष-  आजच्या दिवशी तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. ज्या व्यक्तींसोबत संवाद साधाल त्यांच्यासोबत तुमचं एकमत असेल. कुटुंबासमोर तुमचे निर्णय अधिक स्पष्टपणे मांडाल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत. तणावापासून दूर राहा. आर्थिक लाभ कमी होतील. वृषभ- या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कठीण जाणार आहे. तसंच नवविवाहित लोकांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. […]

Daily Horoscope 29 June 2022: 'या' राशीच्या लोकांची आज एका विशिष्ट व्यक्तीशी होणार भेट
नितीश गाडगे

|

Jun 29, 2022 | 7:00 AM

 1. मेष-  आजच्या दिवशी तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. ज्या व्यक्तींसोबत संवाद साधाल त्यांच्यासोबत तुमचं एकमत असेल. कुटुंबासमोर तुमचे निर्णय अधिक स्पष्टपणे मांडाल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत. तणावापासून दूर राहा. आर्थिक लाभ कमी होतील.
 2. वृषभ- या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कठीण जाणार आहे. तसंच नवविवाहित लोकांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती पाहून तुमचे सहकारी नाराज होतील.
 3. मिथुन- बुद्धिचातुर्याने सारंकाही सांभाळून नेण्याची चिन्हं आहेत. नोकरीसापेक्षा लोकांना सहकाराऱ्यांची साथ मिळेल. पुढे जाण्याची चिन्हं आहेत. इतरांच्या काही अडचणींवर तोडगा काढून देण्यासाठी तुमची मदत होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
 4. कर्क- कोणा एका गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढाल. ज्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा ठराल. जुन्या गोष्टीविसरुन पुढे जा. एखादा असा प्रसंग समोर येईल जो पाहता तुमची विचारसरणीच बदलेल. नोकरीच्या ठिकाणी मोठं यश तुमच्या वाट्याला येईल.
 5. सिंह- नवी संधी मिळेल. तुमच्या योजनांना समर्थन मिळेल. व्यापारात पूर्णपणे यशस्वी व्हाल. नव्या व्यक्तींशी भेट घडेल. नशिबाची साथ असेल. सकारात्मक राहा. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.
 6. कन्या- मानसिक ताणतणावांपासून आता तुमचा दूर होण्यासाठीचा प्रवास सुरु होणार आहे. संपत्तीची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
 7. तूळ- नोकरीतील कोणत्याही बदलांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता. निळा रंग शुभ ठरू शकतो.
 8. वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्यामुळे फायदा होईल. आज कोणत्याही प्रवासाची योजना पुढे ढकलणं योग्य नाही. पिवळा रंग आज शुभ आहे.
 9. धनू- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी थोडंसं त्रासदायक असू शकतं. या ठिकाणी तुम्हाला जे काही मिळेल, ते तुमच्या मेहनतीचे फळ असेल.
 10. मकर- नोकरीत यश मिळाल्याने आज तुम्ही आनंदी राहाल. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर त्या पैशातून फायदा होऊ शकतो.
 11. कुंभ- या राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होणार आहे. प्रवासाचे संकेत असून कुटुंबात काही तणाव संभवू शकतो.
 12. मीन- राजकारण्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मेष आणि मकर राशीचे मित्र आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें