Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर… राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल

Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर… राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Sep 27, 2026 | 1:54 PM

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा आणि अराजकता पसरवण्याचा आरोप केला. मतांची चोरी नाही तर राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावरचे आरोप फोल ठरवले. फडणवीसांनी दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी तातडीने उपाययोजना आणि शेतकरी मदतीची घोषणाही केली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर संविधानिक संस्थांना बदनाम करत देशात अराजकता पसरवण्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे, मतांची चोरी नाही, अशा शब्दात त्यांनी निवडणूक आयोगावरच्या आरोपांचा समाचार घेतला.

राहुल गांधी हे संविधानिक संस्थांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करून लोकांचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची मानसिकता आता पूर्णपणे अति-डावी किंवा साम्यवादी झाली असून त्यांना भारतात अशी राजवट आणायची आहे, असे फडणवीस म्हणाले. निवडणूक आयोगाने संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिल्यानंतरही राहुल गांधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीसांनी स्पष्ट केले की, जनतेने नाकारल्याने आता काँग्रेस ईव्हीएम सोडून निवडणूक आयोगालाच घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमध्ये मतदार कमी झालेल्या १५ जागांवर टीएमसी निवडून आल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भाजपवरच्या आरोपांचे खंडन केले. तसेच, सरकारने २६५ दुष्काळग्रस्त तालुके घोषित केले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Published on: Sep 27, 2026 1:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us