AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हत्येचा बदला घेण्यासाठी आणखी एक हत्या? बस स्थानकातच घडली थरारक घटना

2018 साली एक हत्याकांड यवतमाळमध्ये घडलं होतं. तेव्हा देखील नवरात्रोत्सव सुरु होता. आता पुन्हा चार वर्षांनी तसंच झालंय!

हत्येचा बदला घेण्यासाठी आणखी एक हत्या? बस स्थानकातच घडली थरारक घटना
हत्या करण्यात आलेला युवक संदीप तोटेImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Sep 30, 2022 | 1:30 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Murder News) एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका युवकाची हत्या करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा (Darvha, Yavatmal) येथील बस स्थानकाच्या जवळ थरारक हत्याकांड घडलं. हाती आलेल्या माहितीनुसार, धारदार शस्त्रासोबतच गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) अधिक तपास केला जातोय.

विशेष म्हणजे ही हत्या बदल्याच्या भावनेतून करण्यात आली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आलाय. चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरु केलाय.

यवतमाळच्या दारव्हातील बस स्थानकाजवळ सुंदीप तोटे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यात संदीप सुधार तोटे हा जागीच ठार झाला. या घटनेनंतर ठार झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.

हत्या करण्यात आलेला युवक हा देखील एका हत्या कांडातील प्रकरणाचा आरोपी असल्याची माहिती समोर आलीय. सुभाष दुधे यांची 2018 साली यवतमाळमध्येच हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांड प्रकरणात संदीप हा आरोपी होती.

सुभाष दुधे यांनी 2018 साली दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली. सुभाष दुधे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदीपाचाही खून करण्यात आला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.

सुभाष दुधे हे दारव्हा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. 2018 साली त्यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे 2018 या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळातच दुधे यांचा खून करण्यात आला होता.

आता चार वर्षांनंतर संदीप तोटे याचीही नवरात्रोत्सवाच्या काळातच हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा 2018 सालच्या हत्येची संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, संदीपची हत्या करुन मारेकऱ्यांनी पळ काढला. सध्या पोलिसांकडून फरार मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. पुढली तपास यवतमाळमधील दारव्हा येथील पोलीस करत आहेत. या घटनेनं यवतमाळ हादरुन गेलंय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?