Irrfan Khan Birth Anniversary | ‘मकबूल’ ते ‘लाईफ ऑफ पाय’, इरफान खानचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

Irrfan Khan Birth Anniversary | ‘मकबूल’ ते ‘लाईफ ऑफ पाय’, इरफान खानचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!
Irrfan Khan

आज म्हणजेच 7 जानेवारी 2022 रोजी प्रख्यात भारतीय अभिनेता इरफान खानची (Irrfan Khan) 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी असणाऱ्या इरफानच्या तीन दशकांच्या अभिनय कारकिर्दीत त्याने बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 07, 2022 | 11:17 AM

मुंबई : आज म्हणजेच 7 जानेवारी 2022 रोजी प्रख्यात भारतीय अभिनेता इरफान खानची (Irrfan Khan) 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी असणाऱ्या इरफानच्या तीन दशकांच्या अभिनय कारकिर्दीत त्याने बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याने 1988मध्ये मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’मधून पदार्पण केले. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 29 एप्रिल 2020 रोजी इरफानचे निधन झाले. त्याच्या काही उल्लेखनीय चित्रपटांवर एक नजर टाकूया…

मकबूल

या चित्रपटात इरफान खानने मुख्य भूमिका साकारली होती, जो विशाल भारद्वाजचा शेक्सपियरच्या मॅकबेथवर आधारित होता. 2003 मध्ये आलेल्या या चित्रपटात तब्बू आणि पंकज कपूर यांनीही काम केले होते. या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना प्रचंड आवडली होत. मकबूल या चित्रपटासाठी इरफानने अनेक पुरस्कार जिंकले आणि इंडस्ट्रीतील सर्वात उल्लेखनीय अभिनेत्यांपैकी एक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आला.

पान सिंग तोमर

2011च्या या चित्रपटात इरफानने नॅशनल स्टीपलचेस चॅम्पियन जो पुढे डाकू बनला त्याची भूमिका साकारली होती. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित चरित्रात्मक ड्रामा चित्रपटासाठी अभिनेत्याला 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इरफानने एका क्रीडा नायकाची भूमिका साकारली, ज्याने स्वतःची डाकूंची टोळी तयार केली आणि मध्य भारतातील चंबळ खोऱ्यात तो कुप्रसिद्ध झाला.

तलवार

मेघना गुलजार दिग्दर्शित, हा चित्रपट 2008 मधील नोएडामधील दुहेरी हत्याकांडावर आधारित होता, ज्याने देशाला हादरवून सोडले होते. इरफानने 2015 मधील या क्राईम ड्रामामध्ये CID अधिकाऱ्याची भूमिका केली आहे, ज्याला खूप गदारोळानंतर हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. इरफान एका गुन्ह्याची पुनर्रचना करण्यासाठी आणि तपास करण्यासाठी घटनास्थळी प्रवेश करतो, जिथे या प्रकरणातील प्रथम तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती.

हैदर

विशाल भारद्वाजसोबतच्या या चित्रपटात इरफान ‘रूहदार’ नावाच्या रहस्यमयी माणसाची भूमिका साकारली होती. शेक्सपियरच्या हॅम्लेटवरून प्रेरित 2014चा चित्रपट, नायकाच्या वडिलांच्या भूतावर आधारित एक नाटक आहे. हैदरची भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूरला त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या चुकीच्या खेळाबद्दल रूहदारने माहिती दिली आणि त्याच्या तरुण मनात सूडाची बीजे रोवली जात असतात.

लाईफ ऑफ पाय

या हॉलिवूड चित्रपटात इरफानने प्रौढ पायची भूमिका साकारली आहे. आंग ली दिग्दर्शित, समीक्षकांनी प्रशंसित केलेला हा चित्रपट यान मार्टेलच्या कादंबरीवर आधारित आहे. इरफानने अतिशय संवेदनशीलतेने ही व्यक्तिरेखा साकारली होती, ज्यात तो प्रेक्षकांना चांगला भावाला. 2012 मध्ये रिलीज झालेला ‘लाईफ ऑफ पाय’ हा इरफानचा जागतिक स्तरावरील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे.

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें