AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लोकांनी चुकूनही मखाणे खऊ नयेत अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम…

side effects of makhana: मखाना हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे, ज्यामध्ये फायबर, प्रथिने असतात आणि चरबी कमी असते. ते एक सुपरफूड मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की मखाना प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. काही विशिष्ट आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी ते टाळावे.

'या' लोकांनी चुकूनही मखाणे खऊ नयेत अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम...
MakhanaImage Credit source: Veena Nair/moment/ Getty images
| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 4:18 PM
Share

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि योग्य आहाराचे सेवन नाही केल्यामुळे तुम्हाला आरोग्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात. शरीरालतील लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन कमी करू इच्छिणाऱ्या आणि वजन टिकवून ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी मखाना हा एक परिपूर्ण आरोग्यदायी नाश्ता मानला जातो . कारण त्यात फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे ते सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि तुम्ही जास्त कॅलरीज खाण्यापासून वाचता. याशिवाय, मखाना कमी चरबीयुक्त असतो. १०० ग्रॅम मखान्यात अंदाजे ३४७ कॅलरीज असतात. अशा परिस्थितीत ते तुमचे वजन जास्त वाढू देत नाही.

आरोग्याविषयी जागरूक लोकांसाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येकाने मखाना खाऊ नये. तज्ञांच्यानुसार मखाणा खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु, कोणत्याही पदार्थ सर्वांना पचत नाही. मखाना कितीही फायदेशीर असला तरी, काही आरोग्याच्या परिस्थितीत ते खाणे टाळणे उचित आहे कारण त्यामुळे स्थिती आणखी बिघडू शकते. कोणत्या लोकांनी मखाना खाणे टाळावे ते जाणून घेऊया.

सुप्रसिद्ध पोषणतज्ञ श्वेता शाह यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, प्रत्येकाने मखाना खाऊ नये. तुमच्या शरीराला काय शोभते ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्ही खाल्लेल्या सर्व पदार्थांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांच्या मते, खालील आरोग्य परिस्थितीत मखाना खाणे टाळा. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही मखाना खाणे टाळावे. कारण ते खाल्ल्याने मल कठीण होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. अशा परिस्थितीत, ज्यांना आधीच बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी मखाना खाणे टाळावे. याशिवाय, जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर मखाना न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या आणखी वाढेल. कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. पोषणतज्ञ म्हणाले की मी कफ प्रकृतीच्या सर्व लोकांना मखाना खाण्यास मनाई करतो . कारण त्यामुळे तुमच्या शरीरात श्लेष्मा निर्माण होईल. अशा परिस्थितीत ते खाणे टाळावे.

मखाना खाण्याचे फायदे….

  • वजन कमी करण्यास मदत – मखामध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मखाना खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते – मखामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • हृदयविकार कमी करण्यास मदत – मखामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकार कमी होण्यास मदत होते.
  • सांधेदुखी कमी करते – मखामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.
  • पाचन सुधारते – मखाना खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते, आणि पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते – मखामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
  • त्वचेसाठी फायदेशीर – मखाना खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात, असे टाइम्स ऑफ इंडियावर नमूद केले आहे.
  • मजबूत हाडं आणि स्नायू – मखामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रथिने असतात, जे हाडं आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.
  • तणाव कमी करते – मखाना खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि शांतता अनुभवते.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.