बदलापूरचे जवान सुनील शिंदे लेहमध्ये शहीद!

सुनील शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. मात्र या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ते बेपत्ता होते.

  • निनाद करमरकर, टीव्ही 9 मराठी, बदलापूर
  • Published On - 23:10 PM, 6 Apr 2021
बदलापूरचे जवान सुनील शिंदे लेहमध्ये शहीद!
jawan martyr

बदलापूरः भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे हे लेहमध्ये बचावकार्यादरम्यान शहीद झालेत. शिंदे हे मूळचे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे आहेत. सुनील शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. मात्र या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ते बेपत्ता होते. (Badlapur jawan Sunil Shinde martyred in Leh)

बर्फाखाली गाडले गेल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता

जानेवारी महिन्याखेर लेह परिसरात हिमस्खलन झाल्यानं बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचावकार्यादरम्यान सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते. मात्र बर्फाखाली गाडले गेल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता. अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली, त्यावेळी शिंदे आणि अन्य जवान मृतावस्थेत आढळले.

भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली

तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. 36 वर्षांच्या सुनील शिंदे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पत्रकार संजय सोनावणे यांचे सुनील शिंदे हे मेहुणे होते.

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांचा हल्ला; दोन जवान शहीद

 जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा उच्छाद सुरूच आहे. श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला. हा हल्ला श्रीनगरच्या लवेपोरा येथे करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  या हल्ल्यानंतर लवेपोरा येथे प्रचंड घबराट पसरली होती. या हल्ल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली होती, तसेच अतिरेक्यांचा शोध घेतला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये शोपियांमध्ये प्रचंड चकमक उडाली होती. त्यावेळी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून मारण्यात आलेले अतिरेकी लष्कर ए तोयबाचे असल्याचं सांगण्यात येत होते.

संबंधित बातम्या

छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब

मोठी बातमी! श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांचा हल्ला; दोन जवान शहीद

Badlapur jawan Sunil Shinde martyred in Leh