
साताऱ्यांच्या फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. अत्यंत गंभीर आरोप या प्रकरणात केली जात आहेत. एका खासदाराचे नावही या प्रकरणात आले. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक नोट तळहातावर लिहिली. या नोटमध्ये त्यांनी पीएसआया गोपाळ बदने याच्यासह प्रशांत बनकर यांची नावे लिहिली. ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसला. संपदा मुंडे या बीड जिल्ह्यांतील असून त्या काही वर्षांपासून फलटणच्या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. फलटणच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला. आता कॉंग्रेस संपदा मुंडेंच्या न्यायासाठी आक्रमक होताना दिसतंय.
आपल्याला काय त्रास होत होता हे संपदा यांनी हातावर लिहिले होते. डॉक्टर संपदा यांच्या आई-वडिलांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून मुलीला शिकवले आणि डॉक्टर केले. मात्र, काही लोकांनी त्यांना इतका जास्त त्रास दिला की, त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराला कॉंग्रेसकडे घेराव घातला जाणार होता. मात्र, पोलिसांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखले आहे.
कॉंग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले असून संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनादरम्यान कॉंग्रेसने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांकडून धडपकड सुरू करण्यात आली. संपदा मुंडेला न्याय द्या… आवाज ‘वर्षा’पर्यंत, काँग्रेसचे मुंबईत उग्र निदर्शने सुरू आहेत.
फलटण प्रकरणी कॉंग्रेसचं आंदोलन म्हणजे नौटंकी करण्याचा प्रकार आहे. राजकीय भांडवल करण्यासाठी आणि अस्तित्व दाखवण्यासाठी कॉंग्रेसचं आंदोलन सुरू असल्याची टीका भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. मोठ्या संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्त्ये या आंदोलनात उतरल्याचे दिसत आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळून देण्यासाठी सुषमा अंधारे देखील मैदानात उतरल्या होत्या.