Phaltan Doctor Death : ही तर संस्थात्मक हत्या; फलटण महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात राहुल गांधींचा घणाघात, भाजपवर आरोप काय?
ahul Gandhi on Phaltan Doctor Death : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Reaction : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात जी न्याय लढाई सुरू आहे. त्यासोबत काँग्रेस पक्ष असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी एक्सवर याविषयी एक पोस्ट लिहिली आहे.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या पीडितेच्या हातावर सुसाईड नोट होती. त्यात पोलीस निरीक्षक गोपाल बदगे आणि प्रशांत बनकर हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. बनकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गोपाल बदगेला आज न्यायालयात हजर करण्यात येईल. दरम्यान याप्रकरणी वातावरण तापले आहे. पीडित महिला डॉक्टरवर अनेकदा राजकीय दबाव आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राहुल गांधींचे ते ट्वीट काय?
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरने बलात्कार, मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. कोणत्याही सभ्य समाजासाठी ही घटना त्रासदायक आहे. एक चांगली डॉक्टर, जी दुसऱ्यांच्या दुःखात मदतीला धावून जात होती. भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील दोषींनी तिचा छळ केला. जनतेच्या रक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी होती, त्यानेच या निरागस मुलीवर अत्याचार केला. तिचे शोषण केले. रिपोर्टनुसार भाजपशी संबंधीत काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
ही संस्थात्मक हत्या
सत्तेचे संरक्षण असल्याने आणि त्या विचारधारेने तिचा जीव घेतल्याचे हे उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांच्या पाठीशी उभी ठाकते, तेव्हा त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी कशी करणार? महिला डॉक्टरची आत्महत्या ही भाजप सरकारच्या अमानवीय आणि संवेदनहीन चेहरा स्पष्ट करते. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आता भीती नाही तर न्याय झाला पाहिजे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.
महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है।
एक होनहार डॉक्टर बेटी, जो दूसरों का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी, भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताड़ना का शिकार…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2025
दरम्यान याप्रकरणात माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पीएवर उद्धव ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पीडितेवर काही कामासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. पण आपले नाव सुसाईड नोटमध्ये नाही. त्यामुळे पुराव्याविना नाहक आरोप करू नये अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली होती. त्यावर दानवे यांनी पुन्हा ट्वीट करत आरोपांची राळ उडवली.
