
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्ंयांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्या महिला डॉक्टरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.! चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते. ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती.!
पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे..
एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.!
चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस… pic.twitter.com/s0sxffq13Y— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2025
दरम्यान सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीमध्ये स्वत:ला संपवले. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सुसाईट नोटमध्ये तरुणीने गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचा उल्लेख केला होता.