
डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडालीये. फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. याशिवाय त्या पुढील शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यासही करत. संपदा मुंडे यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई वडिलांनी मोठी कष्ट करून संपदा यांना डॉक्टर बनवले. संपदा या अत्यंत मेहनती होत्या, एकाही रूग्णाने कधी डॉक्टर महिलेची साधी तक्रारही केली नाही. मात्र, अचानक संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नाव हातावर लिहित संपदा यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. संपदा यांनी आत्महत्या केली असली तरीही असंख्य प्रश्न निर्माण झाले असून दररोज या प्रकरणात धक्कदायक खुलासे होत आहे.
पीडित डॉक्टरांच्या कुटुंबियांनी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली. हेच नाही तर दोन बड्या राजकीय नेत्यांवर या प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. पोलिसांवर दबाव असल्याची आरोप केला जात आहे. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी आरोप करत म्हटले होते की, संपदा यांच्या आत्महत्येनंतर काही तास त्यांचा मोबाईल वापरला गेला. आता त्यावर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिलीये.
पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी म्हटले की, महिला डॉक्टरच्या मोबाईलमधील कोणतीही पुरावे डिलीट करण्यात आली नाहीत. यासोबतच महिला डॉक्टरची कोणतीही डायरी पोलिसांना सापडली नसल्याचेही त्यांनी म्हटले. तुषार दोषी म्हणाले की, पीडित महिलेचा मोबाईलची तपासणी सुरू आहे. तिथे ज्याकाही गोष्टी मिळाल्या त्याची तपासणी केली जात असून पुरावे गोळ्या केली जात आहेत.
पण वैयक्तीक डायरी, नोंदी किंवा कोणत्याही प्रकारची दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाहीये, असे स्पष्टपणे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी म्हटले आहे. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर विविध गंभीर आरोप केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत.