Nashik | Paithani शेल्यावर अवतरले स्वामी समर्थ! Yeola येथील संतोष जेजुरकर यांची कला

| Updated on: Feb 10, 2022 | 2:47 PM

जगप्रसिद्ध पैठणी (Paithani) म्हणून येवल्या(Yeola)ची पैठणी प्रसिद्ध असून येथील कारागीराने पैठणी शेल्यावर श्री स्वामी समर्थ यांचे चित्र आपल्या हातच्या साह्याने विणकाम करून साकारले असून हा पैठणीचा शेला तो अक्कलकोट (Akkalkot) येथे देणार आहे.

Follow us on

जगप्रसिद्ध पैठणी (Paithani) म्हणून येवल्या(Yeola)ची पैठणी प्रसिद्ध असून येथील पैठणी विणकर विविध कला पैठणी साडीवर नेहमीच साकारत असतात. अशाच प्रकारे येवला तालुक्यातील पारेगाव येथील संतोष जेजुरकर या पैठणी विणकाम करणाऱ्या कारागीराने पैठणी शेल्यावर श्री स्वामी समर्थ यांचे चित्र आपल्या हातच्या साह्याने विणकाम करून साकारले असून हा पैठणीचा शेला ते अक्कलकोट (Akkalkot) येथे देणार आहेत. या पैठणी कारागीराला श्री स्वामी समर्थचे चित्र पैठणीच्या शेल्यावर काढण्याकरता 15 दिवसांचा कालावधी लागला असून यानंतरही विविध असे निसर्गाचे तसेच देवदेवतांचे चित्र पैठणीवर साडीवर साकारणार असल्याचा मानस या विणकर कारागीराचा आहे. ग्रामीण भागातील कारागीराने पैठणीवर श्री स्वामी समर्थ साकारल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. मनमोहक अशी ही पैठणी आपल्याला व्हिडिओत नजरेस पडते.