Multibagger Share | या शेअरचा छप्परफाड रिटर्न, दहा वर्षांतच केली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

Multibagger Share | या कंपनीने दहा वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले. 3 रुपयांचा शेअर आता 900 रुपयांवर पोहचला आहे. ज्यांनी सुरुवातीलाच एक लाख रुपये गुंतवले असतील. ते आज कोट्याधीश नक्कीच झाले असतील. त्यांच्या हाताला शेअररुपी परीस लागला आहे. कोणता आहे हा शेअर?

Multibagger Share | या शेअरचा छप्परफाड रिटर्न, दहा वर्षांतच केली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 3:48 PM

नवी दिल्ली | 22 February 2024 : IT सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी Dynacons System ने गुंतवणूकदारांना दहा वर्षांतच मालदार केले. या शेअरने छप्परफाड रिटर्न दिला आहे. डायनाकॉन्स सिस्टिम्स अँड सोल्यूशन्सचा शेअर गुरुवारी 6 टक्क्यांच्या तेजीसह 916.65 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअरने गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी दाखवली. या कंपनीचा शेअर दहा वर्षांपूर्वी अवघ्या 3 रुपयांना होता. या शेअरने आता 900 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या शेअरने या कालावधीत 29000 टक्क्यांची उसळी घेतली आहे. डायनाकॉन्स सिस्टिम्सचा शेअरने गेल्या 52 आठवड्यात 283.30 रुपयांचा निच्चांक गाठला आहे.

अशी घेतली उडी लांब

डायनाकॉन्स सिस्टिम्सचा शेअरमध्ये गेल्या दहा वर्षांत जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 28 फेब्रुवारी 2014 रोजी 3 रुपयांवर होता. डायनाकॉन्स सिस्टिम्सचा शेअर 22 फेब्रुवारी 2024 रोजी 916.65 रुपयांचा टप्पा गाठला. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 29,700 टक्क्यांची उसळी आली. जर एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या शेअरचे मूल्य सध्याच्या किंमतीनुसार 3.05 कोटी रुपये असते.

हे सुद्धा वाचा

4 वर्षात शेअर्समध्ये 6,000 टक्क्यांची उसळी

डायनाकॉन्स सिस्टिमचे शेअर गेल्या चार वर्षात सूसाट पळाले. या शेअर्सने 6,000 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली. कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 14.35 रुपयांवर होता. या कंपनीचा शेअर 22 फेब्रुवारी 2024 रोजी 916.65 रुपयांवर पोहचला. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने 130 टक्क्यांची झेप घेतली. या कालावधीत कंपनीचा शेअर 401.65 रुपयांहून 916.65 रुपयांवर पोहचला. प्रत्येक टप्प्यावर या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ज्यांनी लवकर गुंतवणूक केली. त्यांना छप्परफाड कमाई करता आली. तर ज्यांनी नंतर गुंतवणूक केली. त्यांना पण चांगला परतावा मिळाला आहे.  गुरुवारी बाजार बंद होण्यापूर्वी दुपारी 3:47 वाजता हा शेअर 895 रुपयांवर ट्रेड करत होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.