निकालानंतर थलपति विजय त्रिशा कृष्णनशी लग्न करणार? त्रिशाच्या आईने दिलेला मोठा संकेत

तामिळ सुपरस्टार विजय थलपती निवडणुकीच्या निकालानंतर चर्चेत आला आहे. निकालानंतर विजय त्रिशा कृष्णनशी लग्न करणार? काही दिवसांपूर्वी त्रिशाच्या आईनेच दिला होता मोठा संकेत?

निकालानंतर थलपति विजय त्रिशा कृष्णनशी लग्न करणार? त्रिशाच्या आईने दिलेला मोठा संकेत
| Updated on: May 04, 2026 | 4:50 PM

तामिळ सुपरस्टार थलापती विजय सध्या तामिळनाडूमधील निवडणुकीमुळे चर्चेत असला तरी काही दिवसांपूर्वी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकाच चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्या वैवाहिक आयुष्यातील तणाव, घटस्फोटाच्या चर्चा आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेल्याने सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केल्याची चर्चा रंगली आहे. या कथित संबंधांमध्ये त्रिशा कृष्णनचे नाव पुढे येत असल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे. मात्र, या सर्व बाबींवर अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

विजय-त्रिशा नात्याच्या चर्चांना उधाण

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान विजय आणि त्रिशा काही ठिकाणी एकत्र दिसल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतच्या अफवा अधिकच बळावल्या. इतकेच नाही तर विजयचा मुलगा जेसन संजय याने आपल्या नावातून वडिलांचे आडनाव काढल्याचीही चर्चा समोर आली, ज्यामुळे या प्रकरणाकडे लोकांचे लक्ष अधिक वेधले गेले.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी विजय आणि त्रिशा निवडणूक निकालानंतर लग्नबंधनात अडकतील अशा अफवा पसरल्या होत्या. या चर्चेला अधिक हवा मिळाली ती त्रिशाच्या आई उमा कृष्णन यांच्या एका सोशल मीडिया रिअॅक्शनमुळे. त्यांनी विजय-त्रिशाच्या लग्नाबाबत दावा करणारा एक फॅन-निर्मित व्हिडिओ ‘लाईक’ केल्याचे सांगितले जाते.

मात्र, काही युजर्सनी हा ‘लाईक’ चुकून झाला असावा असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी दावा केला की उमा कृष्णन याआधीही अशाच प्रकारच्या पोस्ट्सना प्रतिसाद देताना दिसल्या आहेत. याउलट, काही नेटिझन्सनी तपास करताना संबंधित ‘लाईक’ दिसत नसल्याचेही सांगितले, त्यामुळे या दाव्यांबाबत संभ्रम कायम आहे.

तिरुपती दर्शनामुळे चर्चांना आणखी उधाण

दरम्यान, 4 मे रोजी त्रिशाचा वाढदिवस आणि निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ती तिरुपती मंदिर येथे दर्शनासाठी गेल्याचे समोर आले. या घटनेनंतर विजय-त्रिशाच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी जोर मिळाला.

या सर्व घडामोडींमध्ये विजय किंवा त्रिशा यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा आणि दावे हे केवळ सोशल मीडियावर आधारित असल्याचे स्पष्ट होते.

Follow Us