AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत त्या नेत्याला प्रवेश देणे ही मोठी चूकच… शरद पवारांची कबुली

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास आणि विधान परिषदेची उमेदवारी देण्यास जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. परंतु त्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते.

राष्ट्रवादीत त्या नेत्याला प्रवेश देणे ही मोठी चूकच... शरद पवारांची कबुली
शरद पवार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 11, 2024 | 1:12 PM
Share

कधीकाळी भारतीय जनता पक्षात असलेले एकनाथ खडसे पक्षातंर्गत राजकारणास कंटाळले होते. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वादानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी प्रवेश दिला होता. त्यानंतर विधान परिषदेवर आमदार केले होते. आता खडसे पुन्हा भाजपात जात आहे. यामुळे खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात घेणे, ही आपली मोठी चूक असल्याचे शरद पवार यांनी मान्य केल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. पुण्यातील बैठकीत शरद पवार यांनी चुकीची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले सतीश पाटील

माध्यमांशी बोलताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना घेऊन पक्षाच्या काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. तसेच त्यांना आमदारकी देण्याऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना आमदार करावे, असेही म्हटले होते. खडसे बाबत घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मोठी चूक होती, हे पवार साहेबांनी आता मान्य केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.

सूनेसाठी निवडणूक लढवण्यास नकार

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास आणि विधान परिषदेची उमेदवारी देण्यास जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. परंतु त्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते. त्यामुळे त्यांना आमदार करण्यात आले. परंतु त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे केले. आता त्यांची सून रक्षा खडसे हिच्या उमेदवारीसाठी त्यांच्या आजारपणाचे खोटे कारण दिले आणि रावेर लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता भाजपात प्रवेश करणार आहे. हा प्रकार म्हणजे एकनाथ खडसे यांची खेळी होती, हे आता उघड झाले आहे, असे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे दिल्लीला का गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्या भेटी घेतल्या या सर्व बाबी आता समोर आल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली आहे, असा चिमटा डॉक्टर सतीश पाटील यांनी घेतला.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान