AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! हिंदू मुलींची पहिली डिलिव्हरी असते त्यावेळी…, कालीचरण महाराजांच्या आरोपाने मोठी खळबळ, वातावरण तापणार

कालीचरण महाराज हे कायमच चर्चेत असतात आता पुन्हा एकदा ते आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! हिंदू मुलींची पहिली डिलिव्हरी असते त्यावेळी..., कालीचरण महाराजांच्या आरोपाने मोठी खळबळ, वातावरण तापणार
kalicharan maharajImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 6:51 PM
Share

कालीचरण महाराज हे कायमच कोणत्या नं कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.  आता पुन्हा एकदा कालीचरण महाराज चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करत असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे. कालीचरण महाराज यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. हिंदूंमध्ये सिझेरीयन केस जास्त, मग मुस्लिमांच्या बाबतीत का नाही? असा सवाल त्यांनी केलं आहे. पैशांसाठी डॉक्टरांकडून रचण्यात आलेलं हे एक षडयंत्र असल्याचा आरोपही कालीचरण महाराज यांनी केला आहे. कालीचरण महाराज यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या दौंडमध्ये आयोजित हिंदू विराट सभेदरम्यान कालीचरण महाराज यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.  डॉक्टरांकडून डिलिव्हरी जिहाद सुरू असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे. यामध्ये हिंदू डॉक्टरचं आघाडीवर आहेत, असंही ते म्हणाले आहेत.  हिंदू महिलांच्या डिलिव्हरीमध्ये सिझेरीयनचं प्रमाण जास्त असतं, मात्र मुस्लिम महिलांच्या डिलिव्हरीमध्ये ते तेवढं दिसून येत नाही असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज? 

डिलिव्हरी जिहादमध्ये हिंदू डॉक्टर देखील सहभागी आहेत. हिंदू डॉक्टरांचाच जास्त सहभाग आहे. जर एखाद्या मुलिची पहिल्यांदा डिलव्हिरी असेल तर तर तिचं सिझेरियनच करतात. हिंदू बालकांच्या गळ्यातच त्याची नाळ कशी काय अडकते? हिंदू धर्मातील मुलंच का आडवे जन्माला येतात. हिंदूच्या मुलींच्याच बाबतीमध्ये सिझरियनचं प्रमाण जास्त का? मुस्लिम महिलांच्या डिलिव्हरीमध्ये सिझेरीयनचं प्रमाण कमी का आहे? हे डॉक्टरांकडून रचण्यात आलेलं एक षडयंत्रण आहे,  ज्याच्या माध्यमातून डॉक्टर जास्तीत जास्त पैसा कमवत आहेत, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता  

दरम्यान कालीचरण महाराज यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. कालीचरण महाराज यांनी यावेळी थेट डॉक्टरांवरच आरोप केले आहेत. डिलिव्हरी जिहादमध्ये हिंदू डॉक्टर देखील सहभागी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी