
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीपदावर कार्यरत संपदा मुंडे यांनी तळहातावर एक संदेश लिहित थेट आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे एका पीएसआयचे नाव घेत त्यांनी म्हटले की, पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चारवेळा बलात्कार केला. यासोबतच मानसिक छळ केल्याचे सांगत अजून एका पोलिसाचे नाव त्यांनी लिहिले. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून चक्क खासदारावरही आरोप करण्यात आली. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर पोलिस प्रशासनावरच प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. आरोपी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावरही संपदा मुंडे प्रकरणात आरोप करण्यात आलीत.
प्रशांत बनकर याला अटक केली आणि कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा अजून फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर दोन्ही आरोपी फरार झाली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत बनकर याला अटक केली आणि कोर्टात हजर केले त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 28 ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकरला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी पीएसआय गोपाळ बदने याचा शोध घेण्यासाठी सातारा पोलिसांनी काही पथके तयार केली असून त्याचा शोध घेतला जातोय. आरोपी बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूर दाखवत असल्याने सातारा पोलिसांकडून पंढरपूर शहरातील लॉज आणि हॉटेलची कसून तपासणी केली जात आहे. आरोपीचा माघ काढण्याचे काम पोलिसांकडून केल जात आहे. मात्र, अजूनही मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांच्या हाती लागला नाहीये.
संपदा मुंडे यांनी आत्महत्या करताच आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला फलटण सोडले. फलटणमधून तो थेट पंढरपूरला पोहोचला. मात्र, त्यानंतर तो कुठे आहे, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंर मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात काही मोठी खुलासे देखील होऊ शकतात. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.