लता मंगेशकरांना स्वर कोकिळा बनवणारं 77 वर्ष जुनं गाणं; कोपऱ्यात उभं राहुन गायलं पहिल्या हॉरर चित्रपटातील गाणं, कारण…

1949 मध्ये प्रदर्शित झालेला ‘महल’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो. कमाल अमरोही दिग्दर्शित या चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमातील ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील संस्मरणीय गीत म्हणून ओळखले जाते.

| Updated on: Sep 24, 2026 | 4:45 PM
1 / 5
‘आएगा आनेवाला’ची खास बाब म्हणजे गाण्याला रहस्यमय वातावरण मिळावे यासाठी लता मंगेशकर यांनी स्टुडिओच्या कोपऱ्यात उभे राहून गायन सुरू केले. त्यानंतर त्या हळूहळू माइकजवळ आल्या.

‘आएगा आनेवाला’ची खास बाब म्हणजे गाण्याला रहस्यमय वातावरण मिळावे यासाठी लता मंगेशकर यांनी स्टुडिओच्या कोपऱ्यात उभे राहून गायन सुरू केले. त्यानंतर त्या हळूहळू माइकजवळ आल्या.

2 / 5

लतादीदींच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा या गाण्यामुळे लता मंगेशकर यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यावेळी त्या केवळ 20 वर्षांच्या होत्या.

3 / 5

गायकांचे नाव समोर येऊ लागले गाणे लोकप्रिय झाल्यानंतर लोक गायकाचे नाव विचारू लागले. त्यामुळे रेकॉर्डवर गायकांची नावे देण्याची पद्धत अधिक प्रचलित झाली.

4 / 5

‘महल’चे कलाकार चित्रपटात अशोक कुमार यांनी हरि शंकर, तर मधुबाला यांनी कामिनी आणि आशाची भूमिका साकारली.

5 / 5

चित्रपटाची कमाई ‘महल’चे बजेट सुमारे 9 लाख रुपये होते. चित्रपटाने जवळपास 1.45 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते.‘महल’ आणि ‘आएगा आनेवाला’ यांनी हिंदी हॉरर सिनेमा आणि संगीताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us