AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neela Vikhe Patil: मी तिला काही सल्ला देण्याची गरज नाही; पुतणी स्वीडिश संसदेत खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Neela Vikhe Patil: नीला विखे पाटील या स्वीडिश संसदेत खासदार झाल्या आहेत. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Neela Vikhe Patil: मी तिला काही सल्ला देण्याची गरज नाही; पुतणी स्वीडिश संसदेत खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले...
Neela Vikhe PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 12:58 PM
Share

अहिल्यानगरशी नाते असलेल्या नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या रिक्सडाग संसदेत खासदार म्हणून निवडून येत नवा राजकीय टप्पा गाठला आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवलेल्या नीला या ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी स्टॉकहोम नगर परिषदेतही काम केले असून स्वीडिश पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी आहेत. आता त्यांनी नीला यांच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विथे पाटील म्हणाले की, मनस्वी आनंद झाला. पहिल्यापासूनच निला अॅक्टीव राहिलीय. स्विडनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणूनही तीने काम केले. बंधु अशोक पाटील यांनी मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सुजाण नागरिक होण्याची शिकवणही त्यांनी दिली. त्याचा परीणाम आज ती स्विडनची खासदार झालीय. मी तिला काही सल्ला देण्याची गरजच नाही. आपल्याकडची आणि तिकडची कार्यपद्धत वेगळी आहे. आपल्याकडे व्यक्तीद्वेशाने भरलेलं वातावरण आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय जिवनात काम करताना मोठी आव्हाने आहेत. नीलाकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत आणि तिला माझ्याकडून शुभेच्छा.

अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नाती असलेल्या नीला यांचा महाराष्ट्राशीही जवळचा संबंध आहे. बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा रंगली आहे.

नीला विखे पाटील यांच्याबाबत

41 वर्षीय नीला विखे पाटील स्वीडन या उत्तर युरोपातील देशातील खासदार झाल्या आहेत. 349 सदस्य असलेल्या संसदेत (Riksdag / Sveriges riksdag) खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आणि त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्या. त्या विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या नीला या कन्या आहेत. तर जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान