AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पाकिस्तानच्या रिझवान-शकील जोडीने भारताला सतावलं, हार्षित राणाने केली चूक; हार्दिक भडकला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. हा सामन्यात एक चूक चांगलीच महागात पडत असते. कधी कधी पराभवाचं खापरही फोडलं जातं. हार्षित राणाच्या बाबतीतही असंच घडलं. मोहम्मद रिझवानचा हाती आलेला झेल सोडला.

Video : पाकिस्तानच्या रिझवान-शकील जोडीने भारताला सतावलं, हार्षित राणाने केली चूक; हार्दिक भडकला
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 23, 2025 | 5:29 PM
Share

भारत आणि पाकिस्तान या सामन्यात चुकीला माफी नसते. कारण या दोन्ही देशातील क्रिकेट सामना युद्धापेक्षा कमी नसतो. त्यामुळे आपल्या हातून चूक होऊ नये असंच क्रिकेटपटूंना वाटत असतं. साखळी फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. भारताने पाकिस्तानच्या धावगतीला काही अंशी खिळ लावली होती. पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात बाद झाल्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. पण तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी सावध खेळी केली. धावांची गती भले कमी होती. पण पाकिस्तानने खेळ लांबवण्यात यश मिळवलं. रिझवान आणि सउद शकीलने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवानने या भागीदारीत 46 धावांचं योगदान दिलं. तर सउद शकीलने अर्धशतकी खेळी केली. एक क्षण असा आला की ही जोडी फोडली नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे रोहित शर्माने 33 वं षटक हार्दिक पांड्याच्या हाती सोपवलं. पण या षटकात हार्षित राणाने चूक केली.

मोहम्मद रिझवान आणि सउद शकील ही जोडी फोडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होता. दुसरीकडे, धावगती वाढवण्यासाठी मोहम्मद रिझवानने संधी घेण्याचा निर्णय केला. हार्दिक पांड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने उत्तुंग फटका मारला. हा चेंडू इतका वर चढला की सहज झेल असं वाटलं. या चेंडूखाली हार्षित राणा पोहोचलाही. पण झेल काही पकडू शकला नाही. यामुळे हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. तसेच दोन धावा फुटकच्या आल्या.

रिझवान आणि शकील जोडी शेवटच्या षटकात तोडफोड करतील अशी धास्ती क्रीडाप्रेमींना वाटत होती. पण अक्षर पटेलने ही भीती दूर केली. 34 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लिन बोल्ड केलं. यामुळे हार्षित राणाचा जीव भांड्यात पडला. कारण मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळी करत धावा केल्या असत्या तर हार्षित राणावर सर्वच स्तरावरून टीकेचा भडिमार झाला असता.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा