AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एटीएम कार्डशिवाय कॅश काढता येणार, युपीआयचे नवीन ATM आले, फसवणूकीचा धोका टळणार

एटीएममधून तुम्हाला कॅश काढायची असेल तर आता एटीएमकार्ड बाळगण्याची गरज लागणार नाही. आता तुम्ही एटीएमकार्ड शिवाय युपीआयच्या मदतीने कॅश काढू शकणार

आता एटीएम कार्डशिवाय कॅश काढता येणार, युपीआयचे नवीन ATM आले, फसवणूकीचा धोका टळणार
upi only atmImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 06, 2023 | 12:37 PM
Share

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : आता एटीएममधून कॅश काढण्यासाठी एटीएम कार्डची काही आवश्यकता नाही. हिताची पेमेंट सर्व्हीसेसने ( Hitachi Payment services )  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ( NPCI ) सोबत पहिले व्हाइट लेबल युपीआय एटीएम लॉंच ( White-label UPI ATM )  केले आहे. या एटीएम सुविधेने एटीएम कार्ड शिवाय कॅश काढण्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे या ओन्ली युपीआय-व्हाईट लेबल एटीएमवर घोटाळेबाजांना स्किमिंग करता येणार नसल्याने फसवणूकीचा धोका टळणार आहे.

कॅश डीपॉझिटची सुविधा मिळणार

जेथे पारंपारिक बॅंकींग पायाभूत सुविधा आणि कार्ड एक्सेसची मर्यादा आहे तेथे मनी स्पॉट युपीआय एटीएम सुविधा बॅंकींग सेवा वापरणे सोपे करणार आहे असे हिताची म्हटले आहे. हिताची पेमेंट सर्व्हीसेस एकमेव व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर असून जी कॅश डीपॉझिटची सुविधा देखील उपलब्ध करते. या सेवेचा वापर 3000 हून अधिक एटीएम लोकेशनवर वापरली जाते.

डीजिटल देवाण – घेवाणीमध्ये युपीआयचा वाटा

हिताची म्हटले आहे की युपीआयने देशात सर्वाधिक वाढ होणारे पेमेंट सोल्युशन आहे. डीजिटल देवाण-घेवाणीत याचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. हिताची पेमेंट सर्व्हीसेसच्या कॅश बिझनेसचे एमडी आणि सीईओ सुमिल विकमसी यांनी म्हटले आहे की देशाच्या नागरिकांसाठी इनोटिव्ह बँकिंग सेवा सुलभतेने वापर होण्यासाठी युपीआय एटीएम आमची तांत्रिक क्षमता सिद्ध झाली आहे. नव्या सुविधेत कोणत्याही बॅंक ग्राहकाला क्युआर आधारित युपीआय कॅश विदड्रॉअलची सुविधा मिळत आहे.

सुरक्षित बॅंकींगचा नवा पर्याय मिळणार

युपीआय एटीएमच्या लॉंचिंग पारंपारिक एटीएमच्या तुलनेत युपीआयची सुविधा आणि सुरक्षेला एकत्र मिलाफाने बॅंकींग सेवेमध्ये नवा पर्याय उपलब्ध केला असल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे. या नव्या सुविधेमुळे भारताच्या दुर्गम भागातही फिजिकल कार्डच्या गरजेशिवाय कॅश मिळण्यासाठी इस्टंट एक्सेससाठी डीझाईन केले आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.