Diwali Offer : यावर्षी गरिबांची दिवाळी होणार दणक्यात, रेशनकार्ड धारकांसाठी सरकारची खास ऑफर
राज्य सरकारकडून खास दिवाळी पॅकेज देण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरिबांची दिवाळी गोड होणार आहे.
मुंबई : आज मंत्रिमडळ बैठकीत रेशनकार्ड (Ration card )धारकांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. राज्य सरकारकडून खास दिवाळी पॅकेज देण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. शिंदे-भाजप सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याने सरकार तर्फे रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी मंत्रिमडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Published on: Oct 04, 2022 04:41 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

