Sanjay Raut : बॅरिस्टर जिना यांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची सरकारवर मिश्किल टीका

Sanjay Raut : बॅरिस्टर जिना यांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची सरकारवर मिश्किल टीका

| Updated on: Apr 03, 2025 | 6:42 PM

Sanjay Raut In Lok Sabha : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज लोकसभेत बोलताना भाजपवर वक्फ बोर्ड विधेयकावरून टीका केली आहे.

कालपासून विधानसभेत आणि लोकसभेत दोन्हीकडे अचानक गरीब मुस्लिमांविषयी खूप काळजी वाटत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे मला आता भीती वाटायला लागली आहे. मुस्लिमचं नाही तर यामुळे हिंदू सुद्धा घाबरलेले आहेत, अशी मिश्किल टीका खासदार संजय राऊत यांनी लोकसभेत बोलताना सरकारवर केली आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, बॅरिस्टर जिना यांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती. मला वाटतं की जिन्नांचा आत्मा कबरीतून उठला आहे आणि रिजिजूजींच्या शरीरात प्रवेश केला आहे. तुम्हाला मुस्लिमांची काळजी कधीपासून सुरू झाली? तुम्ही लोक त्यांना चोर म्हणता, तुम्ही म्हणता की मुस्लिम तुमची जमीन हिसकावून घेतील, तुमच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेतील. मग आता काळजी का? असा प्रश्न देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे. अयोध्येत १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला. केदारनाथमध्ये ३०० किलो सोने गायब झाले. तुम्ही तुमच्या जमिनींचे रक्षण करू शकत नाही आणि तुम्ही मुस्लिमांच्या जमिनींचे रक्षण करण्याबद्दल बोलत आहात. जर तुम्हाला जमिनीची चिंता असेल तर काश्मीरमध्ये आमचे पंडित बांधव आहेत, ४० हजार काश्मिरी पंडितांना त्यांच्या जमिनी परत मिळालेल्या नाहीत. सरकारने त्यांची काळजी करावी. चीनने आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे, सरकारने त्या जमिनीची काळजी करावी, अशी टीका यावेळी राऊत यांनी केली.

Published on: Apr 03, 2025 06:42 PM