अती घाई संकटात नेई! वसईत ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव

एक अॅक्टिव्हा चालक हा भरधाव वेगात ओव्हरटेक करत असताना तो कारवर येऊन धडकला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अती घाई संकटात नेई! वसईत ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 11:43 AM

Vasai Accident Case : राज्यात हिट अँड रन प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी आतापर्यंत हिट अँन रनच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता वसईतही अशाचप्रकारे अपघाताची घटना घडली आहे. एक दुचाकी चालक ओव्हरटेक करत असताना कारला येऊन धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईत भाजपा शहर मंडळ अध्यक्षांचा कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 20 वर्ष तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमित शाहाणी असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरातील तुळजा माता मंदिरासमोर काल दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

अपघाताचा गुन्हा दाखल

वसईत हा अपघात ज्या गाडीमुळे झाला ती चारचाकी i20 कार ही भाजपाचे नालासोपारा शहर मंडळ अध्यक्ष प्रकाश पांड्डे यांची आहे. या अपघातावेळी त्यांचा मुलगा तरुण पांड्डे हा गाडी चालवत होता. एक अॅक्टिव्हा चालक हा भरधाव वेगात ओव्हरटेक करत असताना तो कारवर येऊन धडकला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

या अपघातात अॅक्टिव्हा चालक हा गंभीर जखमी झाला. यावेळी कार चालकाने जखमी तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

वरळीतील  हिट अँड रन प्रकरण चर्चेत

दरम्यान मुंबईतील वरळी भागात एका भरधाव वेगाने असलेल्या एका कारने दुचाकीला धडक दिली. यानंतर महिलेवर गाडी चालवून तिला फरफटत नेण्यात आले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. यावेळी ही गाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह चालवत होता. याप्रकरणी मिहीर शाहाला अटक करण्यात आली. तब्बल तीन दिवसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता राजेश शाहाचा मुलगा मिहिर शाहाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासह त्याला पळून जाण्यात मदत करणारे कुटुंबिय आणि मित्रालाही ताब्यात घेण्यात आले.

Non Stop LIVE Update
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.