Phaltan Dr Sampada Munde Case : डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, दोन्ही आरोपींना…
Phaltan Crime Dr Sampada Munde Death : संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसली. संपदा यांनी आत्महत्येपूर्वी हातावर एक नोट लिहून ठेवली होती. आता या प्रकरणात मोठा खुलासा झालाय.

साताऱ्याच्या फलटण येथील वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर हातावर एक सुसाईट नोट लिहिली. या नोटमध्ये तिने दोन लोकांची नावे लिहिली. पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर याने मला मानसिक त्रास दिला. प्रशांत बनकर याच्या घरी संपदा मुंडे या किरायाने राहत. मात्र, किरायाची खोली असतानाही फलटणच्या एका हॉटेलमध्ये जाऊन संपदा मुंडेने आत्महत्या केली. दोन दिवसांसाठी तिने हे हॉटेल बुक केले होते. संपदा मुंडे प्रकरणात विविध खुलासे होताना दिसली. आरोपी पीएसआय संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर फरार होता. यादरम्यान तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण पोलिस स्टेशनच्या काही सहकार्यांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याने फलटण पोलिस ठाण्यात दाखल होत आत्मसर्मपण केले.
पीएसआय गोपाळ बदने पोलिस तपासाला सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी कोर्टात सांगितले. हेच नाही तर त्याने आपला मोबाईलही फरार असताना कुठेतरी लपून ठेवला. आरोपी हा स्वत: पीएसआय असल्याने त्याला तपास नेमका कसा केला जाणार याची पूर्ण माहिती असल्याने तो तपासात अजिबात सहकार्य करत नव्हता. शेवटी आता या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट आलीये. न्यायालयीन कोठडीनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. फक्त पीएसआया गोपाळ बदनेच नाही तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर याच्याही समस्यांमध्ये वाढ झाली.
फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. कळंबा कारागृहातून SIT ने ताब्यात घेत फलटण न्यायालयात दोघांनाही हजर केले होते. SIT कडून अधिक तपासासाठी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचे नाव आल्याने खळबळ उडाली. एका खासदाराचा मोठा दबाव संपदा मुंडे यांच्यावर होता. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वळण आले. विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केली. आता SIT कडून या प्रकरणातील आरोपींची चाैकशी केली जाणार आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
