
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. चक्क एका खासदाराचे नाव या प्रकरणात आल्याने राजकीय वळण आलंय. आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचा पंढरपुरात सध्या शोध सुरू आहे. पीएसआय गोपाळ बदने यांचे शेवटचे लोकेशन पंढरपुरात ट्रेस झाल्याने फलटण आणि पंढरपूर पोलीस घेत आहेत . पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि लॉजवर जाऊन पोलीस तपासणी करत आहेत. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या दोन टीम आणि सातारा पोलीस पंढरपुरात वेगवेगळ्या लॉजवर शोध घेत आहेत. या प्रकरणी गंभीर आरोप केली जात आहेत.
आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये. मात्र, प्रशांतच्या बहीण आणि भावाने वेगळाच दावा केला. या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर हा पोलिसांच्या ताब्यात आहे तर दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा अजूनही फरार आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये प्रशांत बनकरची रवानगी करण्यात आली.
मुळ बीडच्या असलेल्या संपदा मुंडे यांची नियुक्ती फलटण येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून होती. आई-वडिलांनी अत्यंत मेहनतीने संपदाला डॉक्टर बनवले. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊस उचलले. आत्महत्या करण्याअगोदर हातावर आरोपींची नावे लिहित धक्कादायक खुलासे करत संपदाने आपले आयुष्य संपवले. या प्रकरणात संपदा यांच्या आई वडिलांनी देखील काही आरोप लावली आहेत.
आमदार प्रकाश सोळंके यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलीये. वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे मुंडे कुटुंबीयांची भेट घेताना आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची माहिती घेत जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. आपण त्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देखील यावेळी मुंडे कुटुंबियांना सांगितले. यावेळी प्रकाश सोळंके यांच्या समवेत बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांची देखील उपस्थिती होती.