KDMC : केडएमसीने कंत्राटदाराला टाकले काळ्या यादीत, अनामत रक्कमही जप्त

वाहने पार्क करण्यासाठी स्टेशन परिसरात बोरगावकर वाडी वाहन तळ आहे. त्यासाठीच निविदा मागवून वाहन पार्किंगची सुविधा व्हावी. वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. आता कंत्राटदारालाच काळ्या यादीच टाकल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया नव्याने राबविणार आहे. त्यात पुन्हा वेळ खर्ची होणार आहे.

KDMC : केडएमसीने कंत्राटदाराला टाकले काळ्या यादीत, अनामत रक्कमही जप्त
Image Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 10:58 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने चिन्मय इंटरप्रायझेस या कंत्राटदार (Contractor) कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. या कंपनीची सुरक्षा अनामत रक्कम 1 लाख 54 हजार रुपये जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कंपनी नवी मुंबईची असून ही कारवाई महापालिका उपायुक्त पल्लवी भागवत यांनी केली आहे. सध्या स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केल जात आहे. त्यासाठी स्टेशन परिसरातील वाहन तळ पाडला आहे. काम सुरु असल्याने वाहनांची कोंडी होते. (KDMC blacklists contractor, seizes Rs 1 lakh 54 thousand deposit)

वाहने पार्क करण्यासाठी स्टेशन परिसरात बोरगावकर वाडी वाहन तळ आहे. त्यासाठीच निविदा मागवून वाहन पार्किंगची सुविधा व्हावी. वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. आता कंत्राटदारालाच काळ्या यादीच टाकल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया नव्याने राबविणार आहे. त्यात पुन्हा वेळ खर्ची होणार आहे.

ठेकेदारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान

कल्याण स्टेशन परिसरात बोरगावकर वाडी वाहन तळ आहे. हे वाहन तळ चालविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्याला मिळालेल्या प्रतिसादानुसार चिन्मय इंटरप्रायझेस कंपनीचा उच्चतम दर स्विकारला होता. त्याला काम मंजूर करण्यात आले होते. 15 फेब्रुवारी रोजी त्याला स्विकृती पत्र दिले गेले. त्यानंतर पुन्हा अंतिम पत्र 28 फेब्रुवारी रोजी दिले गेले. कंत्राटदार कंपनीकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. त्याने पुढील कागदपत्रे आणि करारनामा करण्याची प्रक्रिया पार न पाडता महापालिकेचा वेळ वाया घालविला. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. या कारणास्तव महापालिकेने कंत्राटदाराल काळ्या यादीत टाकून अन्य महापालिकांनी त्याला काम देऊन असे नोटिसमध्ये म्हटले आहे. (KDMC blacklists contractor, seizes Rs 1 lakh 54 thousand deposit)

इतर बातम्या

डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआड, ड्रिल मशिनच्या आवाजामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Thane MNS Protest : ठाण्यातील बहुचर्चित आर्ट गॅलरीसाठी मनसे आक्रमक, पालिका प्रशासनाला इशारा

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.