भारत जोडो यात्रेतून काय शिकलात? राहुल गांधींचं अनपेक्षित उत्तर, नेटकरी म्हणाले… ‘Next PM’

राहुल गांधींची प्रतिक्रिया ऐकून नेटकरी म्हणाले.. कडक उत्तर

भारत जोडो यात्रेतून काय शिकलात? राहुल गांधींचं अनपेक्षित उत्तर, नेटकरी म्हणाले... Next PM
| Updated on: Nov 29, 2022 | 1:18 PM

मुंबई : सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा मध्यप्रदेशमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकांशी संवाद साधत आहेत. या भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तु्म्ही काय शिकलात? राहुल गांधींमध्ये काय बदल झाला? असा प्रश्न विचारण्यात आला. मध्यप्रदेशमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्यांना हे विचारण्यात आलं तेव्हा राहुल गांधी यांनी अगदीच अनपेक्षित उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.

“मी राहुल गांधीला काही वर्षांपूर्वी मागे सोडलंय…”, असं राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी मोठा पॉज घेतला. “समजून घ्या की राहुल गांधीला मी कधीच सोडलंय. ते फक्त लोकांच्या मनात आहे”, असं राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

राहुल गांधीच्या या उत्तराने अनेकांची मनं जिंकली. अनेकांनी कमेंट करत राहुल गांधीच्या या उत्तरांचं कौतुक केलंय. अनेकांनी ‘Next PM’ म्हणत भाष्य केलंय. तर आणखी एकाने “बाकी सगळं सोडा, राहुल गांधीच्या डोळ्यातील कॉन्फिडन्स बघा”, असं म्हटलंय.

भारत जोडो यात्रा ही माझ्यासाठी तपस्या आहे. मला या यात्रेकडून काहीही अपेक्षा नाहीयेत. मला वाटलं की धार्मिक तेढामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. ही भिती घालवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय. लोकांना पुन्हा एकदा प्रेम करायला शिकवायला मी रस्त्यावर आलोय, असा राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.