रशियाचे 30 हेलिकॉप्टर उध्वस्त, 9 हजार रशियन सैनिक मारले, यूक्रेनचा दावा
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. यूक्रेननं रशियाचे 9 हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. यूक्रेननं रशियाचे 9 हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे. रशियाच्या हल्ल्याला युक्रेनच्या सैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. युक्रेनच्या सैनिकांकडून रशियन सैनिकांवर हल्ले करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील चर्चा पोलंडच्या सीमेजवळ होणार आहे. तर, रशियावर जागतिक संघटनांकडून निर्बंध घालण्यात येत आहेत.
