AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate | सोन्याला सोन्याचे दिवस, आतापर्यंतचा विक्रमी दर, वर्षाअखेरीस भाव इतका होण्याचा अंदाज

सोनं खरेदीसाठी वर्षाच्या 365 दिवस लगबग सुरु असते. गुढीपाडवा, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी या विशेष दिनी शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा असते. मात्र यंदा वर्षाअखेरीस सोनं आणखी महाग होण्याची तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Gold Rate | सोन्याला सोन्याचे दिवस, आतापर्यंतचा विक्रमी दर, वर्षाअखेरीस भाव इतका होण्याचा अंदाज
| Updated on: Apr 06, 2023 | 5:05 PM
Share

मुंबई | हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, वर्षाच्या 365 दिवस सोने खरेदी सुरुच असते. सोन्याचे दर कितीही चढे असले तरी, प्रत्येक जण आपल्या आर्थिक कुवतीनुसार थोडंफार का होईना पण सोनं खरेदी करत असतो. आता लगीनसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत आहे. मात्र आज (6 एप्रिल) सोन्याने कहर केला. सोन्याला सोन्याचे दिवस आले. सोन्याने नवा रेकॉर्ड करत विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याने 61 हजारचा आकडा पार केला आहे. तसेच या वर्षाअखेरीस सोन्याचा दर हा 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोने खरेदीचा प्लान असलेल्यांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

10 ग्रॅम सोनं – 60 हजार 980

मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

10 ग्रॅम सोनं – 55 हजार 900

सोनं वर्षाअखेरीस 70 हजारांच्या घरात?

दरम्यान 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा या वर्षाअखेरीस 70 हजारांवर जाण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात युद्ध झाल्यास किंवा इतर घडामोडी झाल्यास सोन्याचा भाव हा 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी अंदाज वजा भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या सोन्याच्या सततच्या वाढत्या दरांचा खरेदीवर कसा परिणाम होतो, ग्राहक याला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

सोने दरवाढीचं नक्की कारण काय?

सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, दिवाळखोरीत निघालेली सिलिकॉन व्हॅली बँक, शेअर मार्केटमध्ये होणारे चढ उतार आणि रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

सुवर्ण खरेदी आधी ही खबरदारी घ्या

ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.

सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.

तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.