AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब… चोरटा नग्न होऊन आला अन् विष्ठा करून गेला !; चोरीच्या नव्या प्रकाराने उल्हासनगर हादरले

उल्हासनगरमधील एका मोबाईल दुकानात मध्यरात्री एका नग्न चोराने चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर नग्न अवस्थेत दुकान लूटत असल्याचे दिसले. मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरणाऱ्या या चोराविरुद्ध अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

अबब... चोरटा नग्न होऊन आला अन् विष्ठा करून गेला !; चोरीच्या नव्या प्रकाराने उल्हासनगर हादरले
| Updated on: Feb 15, 2025 | 1:04 PM
Share

एखादा चोर चोरी करताना कोणती पद्धत वापरेल किंवा काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. पण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगमध्ये मात्र एका चोरट्याने चोरी करताना जो प्रकार केला, जी पद्धत यअवलंबली तसं कोणी जन्मात ऐकलं नसेल. आणि यापुढेही कोणी अशी शक्कल लढवेल असं वाटतं नाही. अतिशय विचित्रपणे केलेल्या या चोरीचा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अनोख्या चोरीच सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

उल्हासनगर शहरात एका चोरट्याने नग्न होऊन मोबाईल दुकानात घुसत मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरून नेली. संतापजनक बाब म्हणजे जाताना दुकानातच त्याने विष्ठा केली. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गायकवाड पाडा परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याठिकाणी सुनील गुप्ता यांचं ओम साई राम कम्युनिकेशन हे दुकान आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने या दुकानाचे पत्रे उचकटले आणि दुकानात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा या चोराच्या अंगावर एकही कपडा नव्हता, तो चोर संपूर्ण नग्न अवस्थेत होता. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. त्याने दुकानातील दोन मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरला आणि तो पसार झाला.

मात्र सगळ्यात धक्कादायक आणि किळसवाणी बाब म्हणजे चोरी करून परत बाहेर पडताना या चोरट्याने त्याच दुकानात बसून प्रात:र्विधी केला. त्याची ही प्रत्येक कृती दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सकाळी जेव्हा दुकानाचे मालक सुनिल गुप्ता दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचा अंदाज आला. सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्यावर त्यानी दुकानातील सीसीटीव्ही चेक केला आणि सगळा प्रकार पाहून तेही संतापले. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.