मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुरावली, आता ‘ही’ महत्वाची खुर्चीही दूर जाणार, नवज्योत सिंह सिद्धूंना मोठा झटका!

नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. अश्यात आता पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण पराभवामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता सिद्धू यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची खुर्ची आता दूर जाणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुरावली, आता ही महत्वाची खुर्चीही दूर जाणार, नवज्योत सिंह सिद्धूंना मोठा झटका!
नवज्योत सिंग सिद्धू
| Updated on: Mar 11, 2022 | 11:52 AM

मुंबई : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोललं जातंय. पंजाबमध्ये आपने मोठं यश मिळवलं. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आलं नाही. मुख्यमंत्री चरणसिंह चन्नी (Charansingh Channi) यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. अश्यात आता पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण पराभवामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता सिद्धू यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची खुर्ची आता दूर जाणार आहे.

सिद्धूंची खुर्ची जाणार

सिद्धू यांच्या पराभवानंतर त्यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. द कपील शर्मा शोमधली मानाची खुर्चीही आता काढून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ट्विट करून घोषणा केली आहे.

अशोक पंडीत यांचं ट्वीट

द कपील शर्मा शोचे निर्माते अशोक पंडीत ट्वीट करत सिद्धू कार्यक्रमात दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को-ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये परत दिसू शकत नाहीत”, असं अशोक पंडीत म्हणाले आहेत.

सिद्धू यांच्या हातातून राजकारणातील खुर्ची चर गेली आहे. पण आता द कपील शर्मा शोमधली खुर्ची त्यांनी गमावली आहे. सिद्धू या कार्यक्रमात दिसणार नसल्याने त्यांचे चाहते मात्र नाराज आहेत.

संबंधित बातम्या

‘हिंदी बोलता येतं का?’, समंथाने दिलं प्रामाणिकपणे उत्तर, म्हणाली…

“मी भारतीय नारी नाही म्हणून ट्रोल केलं जातं”; पूनम पांडेची तक्रार

जान्हवीच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टची सोशल मीडियावर चर्चा