AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत कॉफी पिण्याची सवय बनवू शकते तुम्हाला वेळेआधीच म्हातारे , या 4 चुका अवश्य टाळा

कॉफीचे घोट घेत गप्पा रंगविणे हे जरी आनंददायी असले तरी कॉफीचे अति सेवन तुम्हाला अकाली म्हातारपणाच्या दिशेने झपाट्याने घेऊन जातो.

सतत कॉफी पिण्याची सवय बनवू शकते तुम्हाला वेळेआधीच म्हातारे , या 4 चुका अवश्य टाळा
कॉफी Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 17, 2022 | 8:03 PM
Share

मुंबई, ऑफिस असो किंवा कॉलेज कट्टा कॉफी पिल्याशिवाय कदाचितच एखाद्याचा दिवस जात असावा.  नॅशनल कॉफी असोसिएशनच्या अभ्यासानुसार, 62% अमेरिकन दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कॉफी पितात. जर कॉफीचे सेवन (Coffee Addiction) योग्य पद्धतीने केले तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कॉफीचे सेवन केले तर ते शरीराला हानी पोहोचवू (Side Effects) लागते आणि म्हातारपणाकडे वेगाने वाटचाल होऊ लागते. कॉफीचे सेवन कसे करावे आणि त्याचे तोटे टाळण्यासाठी आपण काय लक्षात ठेवले पाहिजे हे जाणून घेऊया.

कॉफीबाबत या चुका टाळा

  1. नाश्ता ऐवजी कॉफी- जर तुम्ही सकाळी नाश्त्याऐवजी एकच कॉफी पिऊन काम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही कॉफीसोबत नाश्ता करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा नाश्त्यामध्ये भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटीन असावेत. असे केल्याने वृद्धत्वाशी संबंधित आजार होणार नाहीत.
  2. साखरेचा जास्त वापर- जर तुम्ही कॉफीमध्ये जास्त साखर घालत असाल तर ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. तुम्ही ब्लॅक कॉफी घेतलीत आणि कमीत कमी साखरेचा वापर केलात तर बरे होईल. वास्तविक वाढत्या वयाबरोबर रक्तदाब, मधुमेह इत्यादी समस्या झपाट्याने वाढतात. मात्र साखरयुक्त कॉफीने या समस्या लवकर सुरु होतात.
  3. पाण्याऐवजी कॉफी पिणे- तुम्ही तहान शमवण्यासाठी कॉफी पीत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरात हायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये असलेले कॅफिन शरीरातील पाण्यासोबत पोषक तत्वांचे शोषण कमी करते. त्यामुळे पचन, त्वचा, एनर्जी लेव्हल इत्यादी समस्या वाढू लागतात आणि वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो.
  4. रात्रंदिवस कॉफी पिणे- सकाळची कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, पण जर तुम्ही रात्री झोपताना तिचे सेवन केले तर तुमच्या झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते. याचा तुमच्या मूडवर परिणाम होतो आणि प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो, ज्यामुळे वयासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.