AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

गरोदरपणात फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्यात अनेक खनिजे असतात जी गरोदर महिला आणि तिच्या बाळासाठी आवश्यक असतात. पण गरोदरपणात काही महिला सकाळी रिकाम्या पोटी फळे खातात. रिकाम्या पोटी फळे खाणे की योग्य आहे का? हे जाणून घेऊ तज्ञांकडून.

गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 03, 2025 | 3:18 PM
Share

गरोदरपणामध्ये योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. आहाराचा थेट परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होत असतो. गरोदरपणात महिलांनी फळे खावी त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. पण काही महिला गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खातात. महिलांनी आपल्या आहारात फळांचा नक्कीच समावेश करावा असे औषध तज्ञ डॉक्टर पंकज वर्मा सांगतात. पण फळे खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणा मध्ये फळे रिकाम्या पोटी खाऊ शकता की नाही हे तज्ञांकडून जाणून घेऊ.

गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाता येतात का?

गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाणे सुरक्षित असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी फळे खातात तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. फळे खाल्ल्याने पचन सुलभ होते. याशिवाय फळे तुम्हाला आवश्यक फायबर देखील फळांमधून मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

फळे तुमच्या शरीरात डिटॉक्सिफिकेशनचे काम करतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात. पण आंबट फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये. आंबट फळे पोटात ऍसिड वाढवू शकतात. त्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.

गरोदर असताना कोणती फळे खाणे सुरक्षित?

केळी, सफरचंद आणि पपई ही फळे गरोदरपणात खाणे सुरक्षित मानले जाते. ही सर्व फळे पचायला सोपी असतात आणि स्त्रीच्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात. मात्र तज्ञांकडून डायट चार्ट बनवून घेतल्यानंतर तुमच्या आहारात फळांचा समावेश करा.

वेळ आणि खाण्याची पद्धत

गरोदर असताना कोणती फळे खाणे फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासोबतच फळे योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाण्यापूर्वी आपण सकाळी पाणी पिऊ शकता. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. नंतर फळे खाल्ल्यानंतर काही वेळाने नाष्टा करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि पोषणही चांगले राहते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...