Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

| Updated on: May 01, 2020 | 7:19 PM

देशातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवला आहे. (Centre Extends Nationwide Lockdown For 2 Weeks) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता 4 मे ते 17 मेपर्यंत लॉकडाऊन असेल.

Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला
Follow us on

Lockdown 3 नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवला आहे. (Centre Extends Nationwide Lockdown For 2 Weeks) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता 4 मे ते 17 मेपर्यंत लॉकडाऊन असेल. गृहमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली. येत्या तीन मेपर्यंत देशात लॉकडाऊन होता. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला. (Centre Extends Nationwide Lockdown For 2 Weeks)  

ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल. रेड झोनमध्ये काटेकोर प्रतिबंध असेल. इथे वाहतुकीला बंदी असेल.

संपूर्ण देशात रेल्वे, विमान, मेट्रो आणि एक राज्यातून दुसऱ्या राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, हॉटेल, सिनेमागृह, जिम, मॉल वगैरे बंद असेल.

ई कॉमर्सला परवानगी

लॉकडाऊन 3 मध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र ही सूट ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच देण्यात आली आहे. या झोनमध्ये ऑनलाईन सामानाची देवाण-घेवाण करता येणार आहे. याशिवाय ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?

रेड झोन (14) : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

ऑरेंज झोन (16) रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (6) – उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

पहिला लॉकडाऊन

यापूर्वी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी मध्यरात्रीपासून पहिल्यांदा 25 मार्च ते 14 एप्रिल यादरम्यान पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा घोषणा करत लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला होता. मग आज केंद्रीय गृहमंत्रालयाने  17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.

यापूर्वीचा लॉकडाऊन

  • (24 मार्च मध्यरात्रीपासून) 25 मार्च ते 14 एप्रिल
  • 15 एप्रिल ते 3 मे
  • 4 मे ते 17 मे

महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांची प्रतिक्रिया

लॉकडाऊनच्या मुदतवाढीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊनची मुदतवाढ अपेक्षित होती. माझ्यासह स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या संवादामध्ये वारंवार याची सूचक कल्पना दिली होती. कोरोनासाठी रेड झोन म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रामध्ये तशीही कोणतीही शिथिलता दिली जाणार नव्हती. ते मत राज्याचंही होतं. केंद्राने देखील तेच सांगितलं आहे. ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्येच काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार आहे.”

संंबंधित बातम्या 

तीन मेनंतर झोननुसार मोकळीक, कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?