AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : AIR STRIKE वर राज ठाकरेंची नकारात्मक प्रतिक्रिया, PM मोदींवर टीका

Raj Thackeray on Operation Sindoor : "मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा" असं राज ठाकरे म्हणाले. 'आज नाक्या- नाक्यावर ड्रग्स मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे' असं राज ठाकरे म्हणाले.

Operation Sindoor : AIR STRIKE वर राज ठाकरेंची नकारात्मक प्रतिक्रिया, PM मोदींवर टीका
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 12:09 PM
Share

“पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं टि्वट केलेलं. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही” अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राइकनंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी अतिरेकी ठार मारले” असं राज ठाकरे म्हणाले. “दुसऱ्यादेशामध्ये युद्ध परिस्थिती आणायचीय. आता मॉक ड्रील करायचं, सायरन वाजवायचे. मूळात ही गोष्ट का घडली? याचा अंतमूर्ख होऊन आपण विचार करणं गरजेच आहे. मूळात पाकिस्ताना हा आधीच बरबाद झालेला देश आहे” असं राज ठाकरे म्हणाले.

“ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला, ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती?. मॉकड्रीलपेक्षा पण कोम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेच आहे. एअर स्ट्राइक करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवण यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.

‘मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा’

“सरकारच्या चूका तुम्हाला दाखवल्या पाहिजेत. ज्यावेळी हे सर्व झालं, त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. तो दौरा सोडून ते आले. बिहारला प्रचारासाठी गेले, ती गोष्ट करायची गरज नव्हती. केरळला अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले. मुंबईत वेव्हच्या समीटला आले. इतकी गंभीर परिस्थिती होती, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या” असं पीएम मोदी म्हणाले. “मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा” असं राज ठाकरे म्हणाले. ‘आज नाक्या- नाक्यावर ड्रग्स मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे’ असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.