रात्री उशिरा शरणागती, तासभर कसून चौकशी, कॅमेऱ्यासमोर हात जोडले… बदनेच्या अटकेनंतर काय काय घडलं?
Phaltan Doctor Death case : फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येतील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामधील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला आज कोर्टात हजर केले जाईल.

फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. संपदा मुंडेने आपल्या तळहातावर नाव लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केली. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर काही तासात पोलिसांनी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली. मात्र, पीएसआय बदने हा फरार होता. शेवटी आरोपी पीएसआय बदने हा फलटण पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर बदनेचा ताबा शहर पोलिसांनी घेतला. पोलिस खात्यातून बदनेला निलंबित करण्यात आलंय. रात्री मोठ्या घडामोडी सातारा जिल्हात घडल्या. रात्री उशिरा बदनेला मेडिकल करण्यासाठी नेण्यात आले.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला आज न्यायालयात हजर केले जाईल. यामधील दुसरा आरोपी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला अगोदरच कोर्टात हजर केले असून त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून गोपाळ बदने हजर झाला.
या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला काल पहाटे पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. मयत डॉक्टरचे हातावर लिहिलेल्या नावांमधील दोन्ही आरोपी सापडल्यामुळे आता या प्रकरणातील सर्व ही समोर येईल. रात्री उशिरा पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण आला. आरोपी पीएसआयला पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी काही पथके तयार केली होती आणि त्याचा शोध घेतला जात होता.
हेच नाही तर पोलिस मेडिकलला घेऊन जात असताना आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने माध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहून हात जोडले. त्यापूर्वी पोलिसांनी त्याची तब्बल एक तास कसून चाैकशी केली आणि त्यानंतर त्याला मेडिकलला घेऊन जाण्यात आले. मला निष्कारण अडकवले जातेय, असे मेडिकलला घेऊन जात असताना आरोपीने म्हटले.
आज पोलिस पीएसआय गोपाळ बदनेला कोर्टात हजर करतील, त्यानंतर कोर्ट किती दिवसांसाठी गोपाळ बदनेला पोलिस कोठडीत पाठवते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी लेकीच्या आत्महत्येसाठी जे कोणी दोषी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी थेट मागणी केली. बीड जिल्हातील राजकीय नेतेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
