AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

monsoon forecast : पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार; 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाची प्रतिक्षा होती, अखेर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

monsoon forecast : पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार; 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
Weather expert Punjabrao Dakhs monsoon forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 4:25 PM
Share

मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन, जवळपास 20 दिवस उलटले होते. मात्र राज्यात पावसाने हजेरी न लावल्याने चिंता वाढली होती. परंतु आता गेल्या 24  तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान 22 जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आता मंगळवारपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 30 जूनपर्यंत मान्सूनची हीच स्थिती कायम असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सूनबाबत आपला नवा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या 10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे डख यांचा नवा अंदाज?  

महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे, पुढील काही तासांमध्ये जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलाढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा असा सर्वत्र जोरदा पाऊस होणार आहे. 24 जून, 25 जून, 26 जून हे चार दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही, सगळ्या शेतकऱ्यांचा पेरण्या होणार आहेत. पूर्व विदर्भ, पश्चि विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, खानदेश, मराठवाडा, या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावणार आहे,  मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक, रत्नागिरी ते रायगड या पट्ट्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकरणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरण्यांना वेग येणार आहे.

Follow Us
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?