शिंदे-फडणवीस म्हणाले ‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ पण पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल!

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या त्या सूचना पोलिसांनी का पाळल्या नाहीत? कारणंही समोर!

शिंदे-फडणवीस म्हणाले देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पण पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल!
महत्त्वाची बातमी...
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 26, 2022 | 10:36 AM

अश्विनी सातव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यात (Pune News) पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा पाऊल उचललं. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) एका जुन्या निकालाचा दाखला दिलाय. या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनीही घोषणाबाजी देणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल केला. पण अखेर गुन्हा दाखल केलेल्यांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

पाहा व्हिडीओ : शिंदे फडणवीसांनी नेमके काय आदेश दिले होते?

पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

दरम्यान, आता देशद्रोहाचं कलम लावण्यात न आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यताय. पीएफआय वर एनआयएने कारवाई केल्यानंतर राज्यात सध्या वातावरण तापलंय. भाजपसह मनसेनंही पीएफआयविरोधात आक्रमत पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्यभर निदर्शनंही रविवारी करण्यात आलेली. अखेर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेतली होती.

गेल्या आठवड्यात राज्यातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भागात एनआयएनं छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान, टेटर फंडिंगच्या आरोपाखाली पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया एनआयएच्या रडारवर आली होती. अखेर याप्रकरणी एनआयएनं मुंबई, नवी मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत गेल्याच आठवड्यात कारवाई केली होती. त्यानंतर पीएफआयविरोधात राज्यातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता.