जगातील पहिली CNG Bike फक्त 10 हजारांमध्ये घरी घेऊन जा, प्रोसेस जाणून घ्या
Bajaj Freedom 125 EMI: तुम्ही जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनी तुमच्यासाठी बेस्ट ऑफर घेऊन आली आहे. ही बाईक केवळ 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळणार आहे. काय आहे संपूर्ण प्रक्रिया, जाणून घेऊया.

Bajaj Freedom 125 EMI: तुम्ही 10 हजारांचे छोटे डाउन पेमेंट करून बाईक तुमच्या घरी आणू शकता. हो. आम्ही सत्य बोलत आहोत. तुम्ही जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. Bajaj Freedom 125 NG04 Drum बाईकची एक्स शोरूम किंमत 89 हजार रुपये आहे. पण. Bajaj Freedom 125 खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10 हजारांचे छोटे डाउन पेमेंट करून बाईक घरी घेऊन जाऊ शकतात. विशेष म्हणजे यात सीएनजी तसेच पेट्रोल मोड देण्यात आला आहे. याविषयी पुढे सविस्तर जाणून घेऊया.
बजाज कंपनीने जगातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 लाँच करून बाईक बाजारात खळबळ उडवून दिली आहे. लाँच होताच या बाईकची मागणी झपाट्याने वाढली आहे. या बाईकमुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला आहे, ही इतर सामान्य बाईकपेक्षा जास्त मायलेज देते. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही 10 हजारांचे छोटे डाउन पेमेंट करून बाईक तुमच्या घरी आणू शकता.
दिल्लीत Bajaj Freedom 125 NG04 Drum बाईकची एक्स शोरूम किंमत 89 हजार रुपये आहे. तर, याची ऑन रोड किंमत 1 लाख 3 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. अशापरिस्थितीत जर तुम्ही एकाच वेळी पूर्ण पैसे देऊन ही बाईक खरेदी करू शकत नसाल तर कंपनी तुम्हाला 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही बाईक देत आहे. यानंतर तुम्हाला उर्वरित पैसे बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून मिळतील. बँक तुम्हाला ९३ हजार ६५७ रुपयांचे कर्ज देणार आहे. जर तुम्ही हे लोन तीन वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला बाईकचा ईएमआय दरमहा 3000 हजार रुपये जमा करावा लागेल.
बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये 125cc चे दमदार इंजिन आहे, जे उत्तम पॉवर आणि मायलेजचे मिश्रण आहे. कंपनीने तरुणांची पसंती लक्षात घेऊन बाईक डिझाइन केली आहे. या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, कम्फर्टेबल सीट आणि एलईडी लाइट्सचे उत्तम फीचर्स मिळतात.
कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये तुम्हाला 60-65 किलोमीटर/किलो मायलेज देण्याची ताकद आहे. लॉग ड्राइव्हसाठीही ही बाईक चांगला पर्याय आहे. यात सीएनजी तसेच पेट्रोल मोड देण्यात आला आहे, जो 130 किलोमीटरची रेंज देण्याची शक्ती आहे.
