जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत… संविधानाच्या मुद्द्यावरून अजितदादा विरोधकांवर भडकले
'. नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांनी घटना दुरुस्ती केली आहे. लालबहादूर शास्त्री दोन वर्ष पंतप्रधान होते. त्यांनी तीन वेळा घटना दुरुस्ती केली. आतापर्यंत जवळपास 106 वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटना दुरुस्ती केली', अजित पवारांनी संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा खसपूर समाचार घेतला.
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विकासाचा विरोधकांकडे मुद्दा नाहीये. विरोधक सांगायला काही नाही म्हणून घटना बदलणार असल्याचं विरोधक सांगताय, असे म्हणत अजित पवारांनी संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा खसपूर समाचार घेतला. तर अमरावतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवार असेही म्हणाले की, घटनेत दुरुस्ती करावी लागते. नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांनी घटना दुरुस्ती केली आहे. लालबहादूर शास्त्री दोन वर्ष पंतप्रधान होते. त्यांनी तीन वेळा घटना दुरुस्ती केली. आतापर्यंत जवळपास 106 वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटना दुरुस्ती केली. मागास आयोगाची मुदत संपली होती. ती मुदत वाढवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागली. मागास आयोगाची गरज नव्हती का? असा सवालही त्यांनी केला. आमचं सरकार आल्यावर महिलांना आरक्षण देऊ असं सांगत होते. पण कोणी दिलं नाही. तसं करायला धमक लागते. 370 कलम रद्द करण्यासाठी दुरुस्ती करावी लागली. जम्मू-काश्मीर आपला भाग होता. दुरुस्ती केली त्यामुळे आपण तिथे जमीन खरेदी करू शकतो. राज्य सरकारने तिथे जमीन घेतली आहे. महाराष्ट्र सदन आपण बांधणार असल्याचे दादांनी सांगितले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

