Heatwaves In Akola : अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
Maharashtra hottest city : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अकोल्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. सध्या अकोल्यात तापमान 44.2 अंश पर्यंत पोहोचला आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अकोल्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. सध्या अकोल्यात तापमान 44.2 अंश असल्याने सूर्य आग ओकत असल्याची भावना अकोल्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. राज्यातील सर्वात हॉट सिटी म्हणून सध्या अकोल्याकडे बघितले जात आहे.
राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंदण अकोल्यात झाली आहे. उन्हाळ्याचे 2 महीने अद्यापही बाकी असताना आत्ताच उन्हाच्या कडक्याने नागरिक हैराण झालेले आहेत. अकोल्यात उन्हाचा चटका सकाळीच जाणवायला सुरुवात होते. दुपारच्या वेळी अकोल्याचे रस्ते सुनसान पडलेले बघायला मिळत आहे. उन्हाच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाकडून देखील कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन अकोल्याच्या नागरिकांना करण्यात आलेलं आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

