तर भारतात आरक्षण रद्द करु…काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधी जेव्हा केव्हा परदेशात जातात,त्यावेळी वाद निर्माण केले जातात किंवा होतात. अमेरिकेतील विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात त्यांनी केलेल्या एका विधानाने पुन्हा वादंग निर्माण झाला आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात भारतातील सामाजिक आणि राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. भारतात अजूनही वंचित गटाला मुख्य सामाजिक प्रवाहात स्थान नाही. भारतात अशी समानता येईल त्यावेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करु असे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या व्याख्यानात केले आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत एकही आदिवासी नाही, दलित नाही, ओबीसी नाही..ही परिस्थिती योग्य नाही. जोपर्यंत भारतात ही स्थिती नाही तोपर्यंत आरक्षण चालू रहायला हवे अशाच आशयाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करीत भाजपा नेत्यांनी राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत असा प्रचार सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Latest Videos
Latest News