Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य सरकारकडून नागरिकांना इशारा, पुढील 3 ते 4 तासांत…
महाराष्ट्रात कधी मान्सून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असताना हवामान खात्याकडून सहा जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या आपत्ती विभागातर्फे नागरिकांना सतर्क राहण्यासंदर्भातील एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून नागरिकांना गरज असेल तर घराबाहेर पडा असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. तर राज्यातील सहा जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिमुसळधार आणि सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Published on: May 26, 2025 10:07 AM
