1 रुपयात 1 किलोमीटर धावणारी कार, सर्व सामान्य लोकांच्या बजेटमध्ये, घेण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त…
भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अशातच जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर ही कार आहे सर्वात बेस्ट. 1 रुपयामध्ये धावते 1 किमी.

Car News : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः रोज ऑफिसला जाणाऱ्या आणि शहरांमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या लोकांसाठी इलेक्ट्रिक कार हा आता परवडणारा आणि स्मार्ट पर्याय ठरत आहे. कमी रनिंग कॉस्ट, आधुनिक फीचर्स, शांत ड्रायव्हिंग अनुभव आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यामुळे ग्राहकांचा कल आता मोठ्या प्रमाणात EV कारकडे वळताना दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आता 15 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतही अनेक दमदार इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये 400 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज, फास्ट चार्जिंग, प्रगत सेफ्टी फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळत आहे. Tata Motors, MG Motor, Mahindra & Mahindra आणि Citroën यांसारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये ग्राहकांना उत्तम पर्याय देत आहेत.
सर्वात स्वस्त कार आणि जास्त रेंज
सध्या बाजारात सर्वाधिक चर्चेत असलेल्या इलेक्ट्रिक कारपैकी एक म्हणजे MG Windsor EV. या कारची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या कारसाठी BaaS (Battery as a Service) मॉडेलदेखील आणले आहे. या मॉडेलमध्ये कारची सुरुवातीची किंमत फक्त 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली असून ग्राहकांना बॅटरी वापरानुसार वेगळे पैसे द्यावे लागतात. या कारमध्ये 38kWh आणि 52.9kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. विशेषतः Pro व्हेरिएंटमध्ये तब्बल 449 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. घरच्या घरी ही कार चार्ज करण्यासाठी अंदाजे 423 रुपयांचा खर्च येतो. म्हणजेच साधारणपणे एका रुपयात एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करता येते.
याचबरोबर Mahindra XUV 3XO EV ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV देखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 13.89 लाख रुपये आहे. शहरातील वापर, पार्किंग आणि दैनंदिन ऑफिस प्रवास लक्षात घेऊन ही कार डिझाइन करण्यात आली आहे. यात सुमारे 350 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.
489 किलोमीटरपर्यंतची रेंज असणारी कार
भारतीय बाजारातील सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV पैकी एक असलेली Tata Nexon EV अजूनही ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. या कारची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17.29 लाख रुपयांपर्यंत जाते. यात 30kWh आणि 45kWh असे दोन बॅटरी पर्याय दिले गेले आहेत. मोठ्या बॅटरी व्हेरिएंटमध्ये तब्बल 489 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.