तीन दिवसापासून पत्नी जेवण बनवत नव्हती, संतापलेल्या पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

| Updated on: Sep 10, 2022 | 9:07 PM

हत्या करणारा पती रिक्षाचालक असून त्याने रागाच्या भरात केलेल्या हत्येच्या कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

तीन दिवसापासून पत्नी जेवण बनवत नव्हती, संतापलेल्या पतीने उचलले हे टोकाचे पाऊल
मृत्यूनंतर 18 महिने केले नाही अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9
Follow us on

लखनौ : पोटाची आग माणसाला काय करायला लावेल, याचा नेम नाही. मग समोर कोण आहे याचे देखील भान राहत नाही. अशाच संतापातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने जेवण बनवले नाही या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वादा (Dispute)ला तोंड फुटले. हा वाद इतका टोकाला गेला की पतीने पत्नीच्या डोक्यात भाकरीचा ताव मारला. हा हल्ला इतका भयंकर होता कि पत्नीचा जागीच मृत्यू (Death) झाला.

ही धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेने पती-पत्नीमधील विसंवाद देखील अधोरेखित झाला आहे.

हत्या करणारा पती रिक्षाचालक असून त्याने रागाच्या भरात केलेल्या हत्येच्या कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

पतीला जीवे मारणाऱ्या पतीला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली आहे. पती-पत्नीमध्ये याआधी भांडण झाले होते का? त्यांच्या भांडणाला आणखी कोणती कारणे आहेत का? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत.

रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा!

आरोपीचे नाव अनुजकुमार मंडल असून तो नोएडाच्या सेक्टर-66 मधील श्रमिक कुंजमध्ये राहतो. तो ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. पत्नीने मागील तीन दिवस जेवण बनवले नाही. या कारणावरून त्याचा संताप अनावर झाला होता.

याच रागातून त्याने शनिवारी सकाळी पत्नीची लोखंडी तव्याने वार करून हत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) अब्दुल कादिर यांनी शनिवारी घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. फेज-3 भागातील सेक्टर-66 मध्ये असलेल्या श्रमिक कुंजमध्ये अनुज कुमार मंडलने त्याच्या पत्नीची हत्या केली.

शनिवारी सकाळी त्याने केलेल्या हल्ल्यात 32 वर्षीय पत्नी खुशबू मंडल हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

चौकशीदरम्यान आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

आरोपी अनुज कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याची पत्नी तीन दिवसांपासून स्वयंपाक करत नव्हती. त्याच कारणावरून घरात रात्री दोघांचे भांडण झाले होते.

सकाळी पुन्हा पत्नीने जेवण बनवले नाही. त्यामुळे राग अनावर झाला. याच रागातून पत्नीच्या डोक्यात तव्याने वार केला. त्यात तिचा मृत्यू झाला, असे अनुजने पोलिसांना सांगितले.