दांडिया खेळायला गेला, किरकोळ भांडणातून जीवच गमावून बसला! नाशिक हादरलं

नवरात्रोत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना, दांडिया खेळताना किरकोळ वाद, तरुणाची चाकू भोसकून हत्या

दांडिया खेळायला गेला, किरकोळ भांडणातून जीवच गमावून बसला! नाशिक हादरलं
तरुणाच्या हत्येनं नाशिक हादरलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 10:15 AM

चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक : नाशिकमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या एका तरुणाची हत्या (Nashik Murder News) करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. दांडिया खेळताना किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ होऊन अखेर तरुणाला धारदार शस्त्राने (Nashik youth killed) भोसकण्यात आलं होतं. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण अखेर ही झुंज अपयशी ठरली असून तरुणाने जीव गमावलाय. यानंतर हत्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Crime) चार जणांना अटक केलीय. पुढील तपास केला जातोय.

नाशिक शहराच्या उपनगर परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान खळबळजनक घटना घडली. दांडिया खेळत असताना झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चक्क चाकूने या तरुणाला भोसकण्यात आलं. यात तरुण गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता.

बाबू लोट असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. पण अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळेच हादरुन गेले आहेत. किरकोळ वादातून बाबू लोट या तरुणाचा दांडिया खेळताना काही तरुणांची वाद झाला होता.

हे सुद्धा वाचा

किरोकोळ कारणातून झालेल्या वादातून बाबू लोट आणि अन्य चार ते पाच जणांमध्ये भांडण झालं. त्याचं रुपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं. पण हा राडा पुढे इतका वाढला, की संतप्त तरुणांनी बाबूला चाकूने भोसकलं. यात बाबू लोट गंभीर जखमी होऊन अखेर त्याचा मृत्यू झालाय.

या घटनेची नाशिकच्या उपनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतलीय. चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये तिघे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या सगळ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. हत्या झालेल्या तरुणासोबत नेमकं कोणत्या कारणावरुन भांडण झालं होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.