AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: गुल्लूचा मोठा खुलासा, अवघ्या 5 महिन्यांत पत्नीसोबत घटस्फोट; कुटुंबानेही सोडली साथ

Bigg Boss 20: या एपिसोडमधील सर्वांत वैयक्तिक खुलासा गुल्लूने केला. काजी तौकीरसोबत बोलताना गुल्लूने त्याचा 2024 मध्ये घटस्फोट झाल्याचं सांगितलं. त्याचं लग्न केवळ चार-पाच महिने टिकल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Bigg Boss 20: गुल्लूचा मोठा खुलासा, अवघ्या 5 महिन्यांत पत्नीसोबत घटस्फोट; कुटुंबानेही सोडली साथ
कुशल तन्वर उर्फ गुल्लूImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 9:55 AM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या स्पर्धकांच्या खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्सेही समोर येत आहेत. अभिनेता आणि रिअॅलिटी शो स्टार कुशल तंवर ऊर्फ गुल्लू याने नुकताच त्याच्या आयुष्यातील एक मोठा आणि आजवर लपवून ठेवलेला प्रसंग उघड केला. मी विवाहित होतो आणि अवघ्या चार ते पाच महिन्यांतच लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला, असा खुलासा गुल्लूने केला आहे. 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बिग बॉसच्या घरात गुल्लूने काजी तौकीरसोबत मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल बोलताना त्याने हा खुलासा केला. हा फक्त ब्रेकअप किंवा साधा हार्टब्रेक नव्हता, तर आपण घटस्फोटातून गेलो होतो, असं त्याने स्पष्ट केलं. गुल्लूने सांगितलं की, त्याचं लग्न केवळ साडेचार ते पाच महिने टिकलं आणि 2024 मध्ये घटस्फोट झाला.

गुल्लूचा हा खुलासा ऐकून काजीही काही काळासाठी आश्चर्यचकित झाला. कारण यापूर्वी गुल्लूच्या लग्नाबाबत फारशी अधिकृत माहिती समोर आली नव्हती. रिअॅलिटी शोमध्ये सक्रिय असताना त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी या फोटोंबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. आता बिग बॉसच्या घरातील गुल्लूच्या वक्तव्यानंतर त्या जुन्या फोटोंची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पहा व्हिडीओ-

गुल्लूने त्याच्या लग्नामागील परिस्थितीवरही भाष्य केलं. त्याच्या कुटुंबात कमी वयात लग्न करण्याचा दबाव असतो, असं त्याने सांगितलं. कुटुंबाच्या दबावामुळे त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लग्नानंतर परिस्थिती सुरळीत झाली नाही. नातं टिकवण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण शेवटी हे नातं पुढे नेणं शक्य नसल्याचं त्याला जाणवलं. घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील काही सदस्य त्याच्याविरोधात गेले. गुल्लूने सांगितलं की, या काळात कुटुंबीयांनी त्याच्याशी बोलणंही बंद केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया जवळपास वर्षभर सुरू होती आणि या संपूर्ण काळाचा त्याच्यावर परिणाम झाला, असं त्याने सांगितलं.

दुसरीकडे ‘बिग बॉस 20’च्या घरात दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. 22 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये घरातील वातावरण राशन टास्कमुळे चांगलंच तापलं. एका बाजूला स्पर्धकांमध्ये रँकिंगवरून वाद झाले, तर दुसरीकडे या टास्कनंतर ईशा रिखी भावूक होऊन ढसाढसा रडताना दिसली. याच एपिसोडमध्ये गुल्लूने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा केला. तर घरातील रँकिंगचा थेट परिणाम संपूर्ण घराच्या राशनवर झाला. कनिकाच्या अंतिम रँकिंगनुसार घरातील सदस्यांची एकूण कामगिरी 10 पैकी 6 इतकी ठरली. त्यामुळे ‘बिग बॉस’ने घरच्यांना पुढील संपूर्ण आठवड्यासाठी फक्त 60 टक्के साप्ताहिक राशन मिळणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे स्पर्धकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका