AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | मुंबई पोलिसांनी सलमान खान याला धमकी देणाऱ्याला केले अटक, धक्कादायक माहिती उघडकीस

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच सलमान खान याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. विशेष म्हणजे चाहत्यांना हा ट्रेलर प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. सलमान खान याला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

Salman Khan | मुंबई पोलिसांनी सलमान खान याला धमकी देणाऱ्याला केले अटक, धक्कादायक माहिती उघडकीस
| Updated on: Apr 11, 2023 | 2:29 PM
Share

मुंबई : किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे शहनाज गिल ही देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. विशेष म्हणजे कालच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. सलमान खान याच्या या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना आवडलाय. मुळात म्हणजे सलमान खान याच्या या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता अगोदरपासूनच बघायला मिळत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट (Movie) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. विशेष म्हणजे ज्यावेळी पठाण अडचणीमध्ये सापडला होता, त्यावेळी सलमान खान हा त्याच्या मदतीला धावून गेल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. विशेष म्हणजे शाहरूख खान आणि सलमान खान यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. नुकताच सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज एक फोन आला आणि त्या फोनमध्ये सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिस हे अॅक्शनमध्ये आले.

मुंबई पोलिसांनी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक केलीये. सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सध्या त्याची चाैकशी करत आहेत. रिपोर्टनुसार सलमान खान याला धमकी देणाऱ्या फोनमध्ये 30 तारखेला सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे देखील म्हटले होते.

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव रॉकी भाई असल्याचे देखील सांगितले होते. आता याला पोलिसांनी अटक केलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. ईमेल करूनही सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. जेलमध्ये असलेल्या लॉरेंस बिश्नोई यानेही काही दिवसांपूर्वी थेट एका मुलाखतीमध्ये सलमान खान याला जीवे मारायचे असल्याचे म्हटले होते.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....