Jeetendra : गिरगावच्या चाळीत 100 कुटुंबीयांसोबत राहिलो अन् आता टॉवरमध्ये..; जितेंद्र यांनी बोलून दाखवली मोठी खंत

Jeetendra : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी लहानपणीच्या त्यांच्या चाळीतील आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, पुण्यातील ट्राफिकबद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Jeetendra : गिरगावच्या चाळीत 100 कुटुंबीयांसोबत राहिलो अन् आता टॉवरमध्ये..; जितेंद्र यांनी बोलून दाखवली मोठी खंत
अभिनेत्री जितेंद्र
| Updated on: Sep 23, 2026 | 10:08 AM

Jeetendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र आज झगमगत्या विश्वात सक्रिय नसले तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजारम मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तीव्र उद्विग्नता व्यक्त केली. एवढंच नाही तर, त्यांच्या 100 कुटुंबाच्या चाळीबद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर शहरात बेफाट वाढलेल्या ट्रॅफिकवर बोट ठेवलं, तसेच बाप्पाच्या चरणी कुटुंबाचे सुख आणि ‘मनाच्या शांती’साठी प्रार्थना केल्याचे सांगितलं.

100 कुटुंबियांच्या चाळीबद्दल जितेंद्र यांचं मोठं वक्तव्य

गणरायाच्या दर्शनासाठी आलेले जितेंद्र म्हणाले, ‘मी ज्या ठिकाणी राहत होतो, माझा जन्म मुंबईत झाला. मी मुंबईत राहायचो, गिरगाव म्हणून तिथे एक जागा आहे. मी एका चाळीत राहायचो, त्या चार माळ्यावर 100 कुटुंब राहत होती. पण ते 100 कुटुंब एका कुटुंबासारखी होती. आता जेथे मी राहतो, तेथे मला 36 वर्ष झाली आहेत. माझ्या बाजूला कोण राहतं हे मला माहिती नाही. मी आज 85 वर्षांचा आहे. पण गिरगाव येथील पूजा मी कधी केली नाही असं झालं नाही. मी कुठेही असलो तरी, गणपतीची पहिली पूजा करण्यासाठी मी येतो. माझ्या मनात प्रचंड गणपतीची श्रद्धा आहे.’

पुण्यातील ट्राफिकबद्दल जितेंद्र यांचं मोठं वक्तव्य

अभिनेते म्हणाले, प्रत्येक वर्ष ट्राफिक वाढतच आहे. ट्राफिक नियंत्रणात नाही. सगळे सर्व बाजूंनी घुसतात आणि एकाच ठिकाणी थांबतात. त्यामुळे कोणाला जायला मिळतच नाही. दोन माणसांनी माझ्या समोरची ट्राफिक हटवली म्हणून पोहोचलो, दीड तास लागला मला….

बप्पाकडे काय मागितलं?

जितेंद्र म्हणाले, ‘मनाची शांती… माझ्या नातवंडांचं सुख जितकं मिळेल ते कमी आहे. मनाची शांती मिळणं फार महत्त्वाचं आहे. जितकं मिळेल तितकं कमीच, फक्त मनाची शांती हवी… बाकी सगळ्या गोष्टी येत जात राहतात.’ असं देखील जितेंद्र म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us