Superstar Singer 2 Winner : ‘सुपरस्टार सिंगर 2’चा विजेता ठरल्यानंतर मोहम्मद फैजकडून ही इच्छा व्यक्त

सोशल मीडियावर मोहम्मदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुपरस्टार सिंगर 2 चा किताब पटकावलेल्या मोहम्मदला शोची चमचमणारी ट्रॉफी आणि त्यासोबत 15 लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळालं.

Superstar Singer 2 Winner : सुपरस्टार सिंगर 2चा विजेता ठरल्यानंतर मोहम्मद फैजकडून ही इच्छा व्यक्त
mohammad faiz
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 12:47 PM

सुपरस्टार सिंगर 2 (Superstar Singer 2) या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अवघ्या 14 वर्षांच्या मोहम्मद फैजने (Mohammad Faiz) या शोचं विजेतेपद पटकावलंय. मोहम्मदने त्याच्या दमदार गायकीने परीक्षक आणि त्याचसोबत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर मोहम्मदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुपरस्टार सिंगर 2 चा किताब पटकावलेल्या मोहम्मदला शोची चमचमणारी ट्रॉफी आणि त्यासोबत 15 लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळालं. मणि (Mani) या शोचा फर्स्ट रनरअप ठरला. प्रांजल बिस्वास, आर्यानंद आर बाबू, ऋतुराज आणि सायशा गुप्ता हेसुद्धा सहा फायनिस्टमध्ये सहभागी होते.

“या शोमुळे मला जे प्रेम मिळालं आणि प्रसिद्धी मिळाली, त्यासाठी मी सर्वांदा खूप आभारी आहे. मी खूप खुश आणि कृतज्ञ आहे. मला जी बक्षिसाची रक्कम मिळाली, ती मी माझ्या आईवडिलांना देईन. कारण फक्त त्यांच्यासाठीच मी या शोमध्ये सहभागी झालो होतो”, अशा शब्दांत मोहम्मदने आनंद व्यक्त केला. “ग्रँड फिनालेदरम्यान प्रत्येकजण भावूक झाला होता. जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले”, असंही तो म्हणाला.

सुपरस्टार सिंगर 2 ही स्पर्धा जिंकल्यानंतर पुढे काय करणार असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी आणखी जास्त रियाज करेन. माझं शिक्षण पूर्ण करेन आणि माझ्या चाहत्यांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करेन.”

मोहम्मदने आपल्या पहिल्याच परफॉर्मन्सपासून परीक्षकांची मनं जिंकली होती. त्याच्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 14 वर्षीय मोहम्मदच्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकसुद्धा मंत्रमुग्ध झाले होते.